दुबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानच्या चित्रपटाइतकेच त्याच्या चित्रपटातील गाण्यांकडे त्याच्या चाहत्यांचे खास लक्ष असते. सलमानच्या गाण्यांइतकीच त्यामधील एक 'हुक' स्टेप नेहमीच लोकप्रिय होते. नुकतीच सलमान खानची अर्पिता त्याच्या मुलाच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये अशाच एका हूक स्टेपवर थिरकताना दिसली.
दुबईत Cipriani Yas या आयलॅन्डवर अहिल शर्माचा दुसरा वाढदिवस साजारा झाला. या पार्टीमध्ये अर्पिता खान शर्मा जॅकलीन फर्नांडिससोबत नाचताना दिसली. जॅंकलीन आणि अर्पिता 'किक 2' चित्रपटामधील 'झुम्मे की रात' है ... या गाण्यावर नाचत होत्या. चित्रपटातील मूळ गाण्यात सलमान खान, जॅंकलीनचा स्कर्ट तोंडात पकडून नाचला होता. सलमान खानप्रमाणेच अर्पितादेखील जॅंकलीनसोबत नाचताना तिचा स्कर्ट तोंडात पकडून नाचत होती.
अर्पिता आणि जॅंकलीनच्या डान्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे.
अभिनेता सलमान खान सध्या 'रेस 3' या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. या चित्रपटाचा शेवटच्या टप्प्यातील अॅक्शन सिक्वेन्स सध्या अबुधाबीमध्ये शूट होत आहे. त्यामुळे सलमान खान 'रेस 3' च्या टीमसोबत दुबईमध्ये आहे. अशात अहिलचं बर्थ डे सेलिब्रेशनही दुबईतील अबुधाबीमध्येच करण्यात आले.
अहिल शर्माचा (दुसरा वाढदिवस 30 मार्चला झाला. त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी खान आणि शर्मा कुटुंबीयातील मंडळी अबुधाबीमध्ये पोहचली होती. आयुष शर्मादेखील त्याचा आगामी आणि बॉलिवूडमधील पदार्पणाचा चित्रपट 'लवरात्री'साठी शूटिंग करत आहे. अहमदाबादमध्ये दिवसभर शूटिंग करून तो थेट दुबईत पोहचला. मध्यरात्री शर्मा कुटुंबीयांनी केक कापून जवळच्या नातेवाईकांसमवेत अहिलच्या बर्थडेचं सेलिब्रेशन केलं.