मुंबई : जगभरात सलमान खानसह बॉलिवूडमधील काही मंडळी जगभरातील त्याच्या फॅन्सला भेटण्यासाठी 'दबंग टूर' आयोजित करतात. नुकतीच सलमान खान त्याची 'दबंग टूर' भारतातील काही ठिकाणीदेखील आयोजित करत आहे. दिल्ली पाठोपाठ सलमान खान शनिवारी (24 मार्च ) पुण्यात पोहचला होता. पुणेकरांसोबत त्याने मराठमोळ्या अंदाजात संवादही साधला.
सलमान खान पुण्यात 'दबंग टुर' साठी त्यांचे परफॉर्मन्स सुरू करण्याआधी काही काळ मीडियाशी बोलत होता. त्यावेळेस प्रेस कॉन्फरस दरम्यान सलमान खानने मराठीमध्ये कॉफीची ऑर्डर दिली.
सलमान खानला कॉफी मिळताच त्याने टेबलवर ती कॅटरिना कैफसोबत शेअर केली आहे. हा व्हिडिओ मीडियाच्या कॅमेर्यामध्ये कैद झाला. त्यानंतर सध्या तो झपाट्याने सोशलमीडियात व्हायरलदेखील होत आहे.
कॅटरिनाला बॉलिवूडमध्ये प्रस्थापित करण्यासाठी सलमान खान तिच्यापाठी गॉडफादरप्रमाणे उभा राहिला. त्यापाठोपाठ कॅटरिना कैफचं हिंदी सुधारण्यासाठी, डान्स सुधारण्यासाठी तिनं मेहनत केली. सलमान खानची आई मराठी असल्याने, तिच्या नातेवाईकांसोबत, मराठी मित्रमंडळींसोबत बोलताना सलमान मराठीचा वापर करतो असे तो म्हणाला. पण जेव्हा कॅटरिनाला मराठीत बोलण्याची आणि प्रश्नांची उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा मात्र तिची तारांबळ उडाली.
पुण्यातील दबंग टूरच्या अंतिम टप्प्यात आभार प्रदर्शनामध्ये सलमानने चाहत्यांशी मराठीत संवाद साधला. त्यानंतर कॅटरिनाही मराठीत बोलणार असे त्याने जाहीर केले. अशावेळेस मनीष पॉल कॅटरिनाच्या मदतीला आला आणि तिला 'मुलगी शिकली प्रगती झाली' हे वाक्य बोलायला मदत केली.