VIDEO: भर गर्दीत सलमान खानने महिलेला Kiss केलं, या कारणाने नेटकऱ्यांचा भाईजानला पाठिंबा

Salman Khan Lady Kissing Video: सलमान खान या अभिनेत्याची इंटरनेटवर कायमच चर्चा रंगलेली असते. आताही त्याचीच चर्चा आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर बराच व्हायरल होतो आहे. यावेळी त्याला ट्रोलही करण्यात आले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 22, 2023, 03:30 PM IST
VIDEO: भर गर्दीत सलमान खानने महिलेला Kiss केलं, या कारणाने नेटकऱ्यांचा भाईजानला पाठिंबा title=
Salman khan seen kissing senior jounalist at iffi 2023 event video viral latest instagram trends (Photo: Instant Bollywood)

Salman Khan Lady Kissing Video: सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या सलमान खानचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर जोरात व्हायरल झाला होता. ज्यात तो चक्क एका महिलेला किस करताना दिसतो आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यातून सलमान खानही ट्रोल होतो आहे. सलमान खान हा आपल्या अभिनयासाठी आणि डायलॉग्ससाठी ओळखला जातो. सध्या त्याचा आणि कतरिनाचा 'टायगर 3' हा चित्रपटही सध्या बॉक्स ऑफिसवर फिकाच पडला आहे. शाहरूख खानच्या यावर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची हा चित्रपट बरोबर करू शकला नाही. परंतु सध्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील आपली जागा बऱ्याच चढ उतारासह कायम ठेवली आहे.

नुकतेच IFFI 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कलाकार, पत्रकार, चित्रपट जाणकार, तज्ञांसह इतरही अनेक पाहुण्यांनी हजेरी लावली होती. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे सलमान खानची. सलमान खानंही यावेळी हजेरी लावली होती. परंतु त्याचा एका व्हिडीओ येथून जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी एका महिलेला पाहताच सलमान खाननं चक्क तिच्या कपाळावर किस केले त्यानंतर मिठीही मारली. पुन्हा एकदा तो तिला किस करण्यासाठी वळला. ही भेट अगदी अचानक होती आणि सलमान खाननं हे गमतीत केल्याचे व्हिडीओतून समजते परंतु या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी विचित्र कमेंट्स केल्या आहेत. 

यावेळी सलमान खान हा रेड कार्पेटवर येतो तेव्हा तो एका महिलेकडे वळतो आणि तिला कीस करतो. या महिला एक वरिष्ठ पत्रकार आहेत सोबतच सलमान खान आणि त्यांचे मैत्रीपुर्ण संबंध आहेत. 

हेही वाचा : Animal: टीझरमध्ये 20 सेकंद दिसला, पण चित्रपटात शून्य डायलॉग; बॉबी देओलच्या भूमिकेबाबत सस्पेन्स

नेटकऱ्यांचे समर्थन: 

परंतु अनेकांनी त्याचीही बाजू घेत त्याचे कौतुकही केले आहे. यावेळी एकानं म्हटलं की, 'इतर सेलिब्रेटी हे प्रचंड माज दाखवतात.' त्यामुळे त्यांनी सलमानच्या कृतीचे समर्थन केले आहे. अनेकांनी 'भाईजान' असंही कमेंटमध्ये लिहिलंय तर काहींनी 'नाईस गाय' असंही लिहिलं आहे. त्यातून एकानं तर असंही म्हटलंय की, 'सलमान खान हा कायमच सर्वांनाच आदर करतो'

पाहा व्हिडीओ :

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भाचीसाठी पोहचला सलमान खान:

'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया'चे यावेळी आयोजन केले होते. यावेळी सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री हिच्या चित्रपटाचे प्रदर्शन होते. 'फर्रे' या चित्रपटातून त्यानं पदार्पण केले आहे. IFFI 2023 साठी या चित्रपटाची निवड झाली होती. यावेळी आपल्या भाचीला प्रोत्साहन देण्यासाठी तो पोहचला होता.