‘टायगर जिंदा है’च्या कमाईबाबत सलमान खान बोलला ही मोठी गोष्ट!

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. 

Updated: Dec 28, 2017, 05:04 PM IST
‘टायगर जिंदा है’च्या कमाईबाबत सलमान खान बोलला ही मोठी गोष्ट! title=

मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या ‘टायगर जिंदा है’ ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. १५० कोटींच्यावर या सिनेमाची कमाई झाली असून आता हा सिनेमा २०० कोटींचा आकडा पार करणार आहे. अशातच सलमान खानचा ५२वा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. 

हे आहे कमाईचं कारण

सलमान खान याने ‘टायगर जिंदा है’ च्या भरघोस कमाईबद्दल एक मोठं वक्तव्य करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तो म्हणाला की, ‘टायगर जिंदा है’ चांगला चालत आहे. याचं एकमेव कारण कॅतरिना कैफ आहे’. सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमानच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर ही पार्टी देण्यात आली.

कतरिनाने काय गिफ्ट दिलं?

कतरिनाने वाढदिवसाला काय गिफ्ट दिलं याबाबत विचारल्यावर सलमान म्हणाला की, ‘तिने मला ‘टायगर जिंदा है’ च्या यशाचं मोठं गिफ्ट दिलं आहे’. तसेच तो म्हणाला की, ‘मी प्रत्येक वर्षी, प्रत्येक मुलाखतीत हेच म्हणतो की, वाढदिवला देशात राहणार नाही. कारण मीडिया आणि प्रशंसक(पनवेल) इथे येऊन नये, असं मला वाटतं. पण प्रत्येकवेळी हे सफल होत नाही. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. पण मी पुढील वाढदिवस नक्कीच साजरा करणार नाही’.