सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

काळवीट शिकार प्रकरणावरून धमकी 

Updated: Sep 25, 2019, 09:12 AM IST
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी  title=

मुंबई : काळवीट शिकार प्रकरणात न्यायालयात सुनावणीला सामोऱ्या जाणाऱ्या अभिनेता सलमान खानला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सोशल मीडियाच्या फेसबुक अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. 

धमकीची ही पोस्ट फेसबुकच्या 'गॅरी शूटर' (Garry Shooter) नावाच्या अकाऊंटवर टाकण्यात आली आहे. 'सोपू' नावाच्या ग्रुपमध्ये ही पोस्ट हिंदीत लिहिण्यात आली असून सलमान खानला यामध्ये चेतावणी देण्यात आली आहे. 

भारतीय कायद्यानुसार तू वाचला असलास तरी बिन्शोई समुदायाच्या कायद्यापासून वाचू शकत नाही. या पोस्टमध्ये सलमान खानचा एक फोटो देखील आहे ज्यावर रेड क्रॉस मारण्यात आली आहे. पोस्टमध्ये लिहिलं आहे की, विचार कर सलमान, तू भारतीय कायद्यातून सुटला आहेस. पण बिश्र्नोई समाज आणि सोपू पार्टीच्या कायदयाने तिला जीवे मारण्याची शिक्षा सुनावली आहे. सोपू न्यायालयात तू दोषी आहेस. 

या पोस्टमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी 27 सप्टेंबर रोजी जोधपुर कोर्टात सादर व्हायचे आहे. जर सलमान खान या दिवशी न्यायालयात हजर राहिला नाही तर त्याची जामीन रद्द होऊ शकते. 

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी ही पहिल्यांदा दिलेली नाही. 2018 मध्ये गँगस्टर लॉरेसं बिश्र्नोईने सगळ्यांसमोर जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर सलमान खानला कडक सुरक्षा देण्यात आली होती.