सलमानच्या 'पार्टनर' सिनेमातील हा छोटू आज एखाद्या चॉकलेट बॉय पेक्षा कमी नाही...

त्या छोट्या रोहनला आता ओळखणे फार कठीण आहे.

Updated: Mar 5, 2022, 02:27 PM IST
 सलमानच्या 'पार्टनर' सिनेमातील हा छोटू आज एखाद्या चॉकलेट बॉय पेक्षा कमी नाही... title=

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे असे अनेक चित्रपट आहेत,जे आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. त्याचा पार्टनर हा चित्रपट आजही तितक्याचं आवडीने पाहिला जातो.

पार्टनरमध्ये सलमान खान, गोविंदा, लारा दत्ता आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसले होते. हा विनोदी चित्रपट खूपच गाजला होता. या चित्रपटात आणखी एक पात्र होते ज्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे.

तो म्हणजे लारा दत्ताचा मुलगा रोहन... रोहनच्या पात्राशिवाय हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नसता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रोहनची भूमिका अली हाजीने साकारली होती. पार्टनरचा छोटा रोहन आता मोठा झाला आहे. त्या छोट्या रोहनला आता ओळखणे फार कठीण आहे.

अली मोठा झाला आहे आणि पूर्णपणे बदलला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. अली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज त्याचे फोटो शेअर करत असतो. तो अजूनही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. तो चाहत्यांना त्याच्या प्रोजेक्ट्सची माहिती देताना दिसतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पार्टनर या सिनेमाला 14 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अलीने सलमान खान आणि गोविंदासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत तो खूपच क्यूट दिसत आहे.