ईदच्या पार्टीत सलमानच्या भाचीची जोरदार चर्चा...बॉलिवूड अभिनेत्रीही 'तिच्या'पुढे फिक्या

 आयुष आणि अर्पिताच्या घरी ईद पार्टीचे आयोजन केलं होतं. या सलमानच्या भाचीने पार्टीत प्रवेश करताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

Updated: May 4, 2022, 03:47 PM IST
ईदच्या पार्टीत सलमानच्या भाचीची जोरदार चर्चा...बॉलिवूड अभिनेत्रीही 'तिच्या'पुढे फिक्या title=

मुंबईः सलमान खानची बहीण अर्पिता आणि आयुषच्या घरी एक ईद पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये मोठ्या स्टार्सनी हजेरी लावली होती, पण या पार्टीत एका सुंदर मुलीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या, आणि ती होती सलमान खानची भाची अलीजेह अग्निहोत्री. पार्टीतील प्रत्येकजण तिच्या सौंदर्यासमोर फिका दिसत होता.

सलमान खानने नुकतीच आयुष आणि अर्पिताच्या घरी ईद पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीत बड्या स्टार्सनी हजेरी लावली, पण सलमानच्या भाचीने पार्टीत प्रवेश करताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.


अलीजेह अग्निहोत्रीने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती, ज्यामध्ये तिची स्टाइल खूपच बोल्ड दिसत होती. त्याचे हे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागले आहेत. फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिचं खूपच कौतुक केलं आहे.

अलीजेह अग्निहोत्री ही सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्री खान आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. अलीजेह लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

पण, अलीजेह सध्या मॉडेलिंगही करत आहे.अलीजेह अग्निहोत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांना तिच्या चाहत्यांसोबत ती नेहमी अपडेट असते.