रेस ३ च्या सेटवर हंगामा ; शूटींग रद्द

बॉलिवूडचा दबंग खान मंगळवारी आपल्या आगामी चित्रपट रेस ३ चे शूटींग करत होता.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 11, 2018, 02:33 PM IST
रेस ३ च्या सेटवर हंगामा ; शूटींग रद्द title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग खान मंगळवारी आपल्या आगामी चित्रपट रेस ३ चे शूटींग करत होता. त्याचदरम्यान तिथे एक अज्ञान मनुष्य हत्यार घेऊन आला. त्यामुळे सेटवर मोठा हंगामा झाला. या प्रकरणाची खबर मिळताच पोलीस सेटवर पोहचले. सलमानच्या जीवाला धोका असल्याने शूटींग बंद करून त्याला सुरक्षित घरी पोहचवण्यात आले. 

रेस ३ च्या सेटवर पोलीस

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, अज्ञान मनुष्य हत्यार घेऊन सेटवर आल्याचे कळताच फिल्म सिटीमध्ये रेस ३ चे शूटींग चालू असताच पोलीस तेथे पोहचले. सलमानच्या जीवाला धोका असल्याने पोलीसांनी सलमान आणि निर्माते रमेश तुरानी यांना शूटींग रद्द करण्यास सांगितले. आणि लवकरात लवकर सलमानला सुरक्षित घरी पोहचवण्यास सांगितले. त्यामुळे ६ पोलीसांसह सलमानला सुरक्षित घरी पोहचवण्यास आले.

सलमानला जीवे मारण्याची धमकी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच जोधपूरच्या कोर्टात सुनावणी दरम्यान गॅंगस्टर लॉरेंस विश्नोई याने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली. सलमानला जोधपूरमध्येच मारण्याची धमकी देण्यात आली होती.

salman

गॅंगस्टरवर हा गुन्हा

१९९८ मध्ये काळवीटाची शिकार केल्याचा खटला जोधपूर कोर्टात सुरू आहे. त्याच्या सुनावणीसाठी सलमान जोधपूर कोर्टात हजर राहीला होता. त्याचदरम्यान खंडणीचा गुन्हा असलेला हा गॅंगस्टर तिथे सुनावणीसाठी आला होता. तेव्हा सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.