मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या दिलदारपणासाठी ओळखला जातो. अनेक चाहत्यांकडून त्याचा हा अंदाज पसंतही केला जातो. सलमान खान अनेक संस्थांशी जोडला गेला आहे. इतकंच नाही तर तो स्वत: बिइंग ह्युमन नावाची एक स्वयंसेवी संस्थाही चालवतो.
सलमान त्याच्या मित्र - परिवाराशिवाय त्याच्याशी जोडल्या गेलेल्या अनेकांची काळजी घेताना दिसतो. याचाच एक प्रत्यय समोर आला आहे. 'दबंग ३'मध्ये सलमानसोबत असलेल्या सहकलाकाराला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर सलमानने त्यांचा रुग्णालयातील संपूर्ण खर्च स्वत: उचलला असल्याचं समोर आलं आहे.
जुलै महिन्यात अभिनेते दद्दी पांडे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी सलमानने आपल्या सहकलाकाराला संपूर्ण मदत करत, त्यांना योग्य ती काळजी घेण्याचा सल्लाही दिला. सलमानने दद्दी पांडे यांचा रुग्णालयातील संपूर्ण खर्च स्वत: केल्याचं बोललं जात आहे.
Aaj being human foundation ne 12 yrs complete kar liya hai app sab ki kripa or support services ke saath . Long n healthy life to all of u n may being human always be there.
Thank u all, god bless! pic.twitter.com/rBU1gAgjeM— Salman Khan (@BeingSalmanKhan) July 4, 2019
'दबंग' सीरिजमध्ये दद्दी पांडे सलमान खानच्या पोलिसांच्या टीममधील एक मेंबर दाखवण्यात आला आहे. जो 'चुलबुल पांडे'चा उजवा हात असल्याचं दाखवण्यात आलं आहे. सलमानने त्याच्या काही लोकांना पाठवून रुग्णालयात पांडे यांची मदत करण्यास आणि त्यांची संपूर्ण काळजी घेण्याचं सांगितलं. याशिवाय बिइंग... फाउंडेशनकडून त्यांच्या उपचारासाठी मदतही केली आहे. सलमानच्या या दिलदारपणाचं चाहत्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.