Salman Khan ला फॉलो करतातअसंख्य लोक, पण भाईजानच्या लिस्टमध्ये 'या' सुंदर महिला

अनेक चाहत्यांच्या मनात असलेल्या सलमानच्या आयुष्यात मात्र सात महिलांना विशेष स्थान, यामध्ये फक्त कतरिनाचं नाही तर....   

Updated: May 28, 2022, 10:42 AM IST
Salman Khan ला फॉलो करतातअसंख्य लोक, पण भाईजानच्या लिस्टमध्ये 'या' सुंदर महिला title=

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या प्रत्येक गोष्टीमुळे चर्चेत असतो. कधी भाईजानचा आगामी सिनेमा, तर कधी वादग्रस्त प्रकरणांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला सलमान कायम अडचणीत असतो. पण आता सलमान एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत असतो. चाहत्यांच्या मनात असलेला सलमान सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सलमान असंख्य लोक फॉलो करतात, पण सलमानच्या लिस्टमध्ये काही ठराविक सेलिब्रिटींची नाव आहेत.

इन्स्टाग्रामवर सलमानला जवळपास 51.9 मिलियन लोक फॉलो करतात. पण सलमान मात्र फक्त आणि फक्त 34 सेलिब्रिटींना फॉलो करतात. सोशल मीडियावर सलमान त्याच्या कुटुंबाला फॉलो करतो. त्यामध्ये अभिनेता अरबाज आणि सोहेल खानचं देखील नाव आहे.

सलमान इंस्टाग्रामवर एकूण 34 लोकांना फॉलो करतो आणि या यादीत फक्त सात अभिनेत्री आहेत. त्यापैकी एक म्हणजे कतरिना कैफ. कतरिना आणि सलमान, ज्यांनी 'भारत' आणि 'टायगर जिंदा है' व्यतिरिक्त अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. एकेकाळी दोघेही एकमेकांना डेट करायचे.

पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. कतरिना शिवाय सलमान संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani), डेजी शाह (Daisy Shah), वलूशा डी सूजा (Waluscha De Sousa), जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez), यूलिया वंतूर (Iulia Vantur) आणि इसाबेल कैफ (Isabelle Kaif) यांना फॉलो करतो.