लुलिया नाही तर या हॉलिवूड अभिनेत्रीला डेट करतोय सलमान खान?

सलमानच्या आयुष्यातून लुलियाची एक्झिट  

Updated: Jan 10, 2022, 12:47 PM IST
लुलिया नाही तर या हॉलिवूड अभिनेत्रीला डेट करतोय सलमान खान? title=

मुंबई :  बॉलिवूडमध्ये अभिनेता सलमान खानची ओळख गॉडफादर आणि लव्हरगुरू म्हणून आहे. सलमानने अनेक नव्या कलाकारांना संधी उपलब्ध करून दिली. तर दुसरीकडे त्याच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. अनेक अभिनेत्रींचं नाव सलमानच्या नावासोबत जोडलं गेलं. पण सलमान नेहमी मी सिंगल आहे, असं सांगत असतो. त्याला अनेकदा लुलिया वंतुरसोबतसोबत स्पॉट करण्यात आलं. पण आता तर सलमान हॉलिवूडच्या एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. 

हॉलिवूड अभिनेत्री  Samantha Lockwood आणि सलमानच्या रिलेशनशिपच्या चर्चा सध्या टॉक ऑफ द टाउन आहेत. खुद्द Samantha Lockwoodने सलमानसोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. एका मुलाखती दरम्यान तिने मोठा खुलासा केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री म्हणाली, 'मला वाटते लोक खूप चर्चा करतात. मी सलमानला भेटली आहे, तो खूप चांगला माणूस आहे... सध्या बोलण्यासाठी एवढं पुरे आहे... मला कळत नाही लोकांना याबाबतीत हिंट कशी मिळते...'

ती पुढे म्हणाली, 'मी फक्त सलमान खानला नाही तर हृतिक रोशनला देखील भेटली. त्या भेटीबद्दल कोणी काही चर्चा केली नाही. म्हणूनच या बातम्या कुठून येत आहेत हे मला माहीत नाही....' Samanthaच्या वक्तव्यानंतर सलमान आणि ती रिलेशनमध्ये आहेत की नाही याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.

एवढंच नाही  तर सलमानच्या वाढदिवशी Samantha त्याच्या फार्महाउसमध्ये होती. याआधी देखील ती भाईजान सलमानला जवळपास तीन-चार वेळा भेटली आहे.