सलमान खानच्या बॉडीगार्डचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

पाहा शेराचा भन्नाट व्हिडीओ   

Updated: Jan 22, 2022, 04:19 PM IST
सलमान खानच्या बॉडीगार्डचा भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल  title=

मुंबई : अनेक सेलिब्रिटींना त्याचे खासगी बॉडीगार्ड्स असतात. पण सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची नेहमीच चर्चा असते. १९९४ पासून सलमानसोबत असलेला शेरा आता सलमानच्या कुटुंबाचा एक सदस्यच झाला असल्याचं म्हणायला हरकत नाही. सलमान कोठेही गेला तरी शेरा त्याच्यासोबत सवली सारखा असतो. शेरा आता फक्त सलमानचा बॉडीगार्ड नाही तर एक सेलिब्रीटी देखील आहे. सोशल मीडियावर अनेक जण त्याला फॉलो करतात.  त्यामुळे त्याची प्रत्येक गोष्ट चर्चेत असते.

आता शेराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये  डान्स करताना दिसत आहे. शेराचा भन्नाट डान्स पाहून तुम्ही देखील त्याच्यासोबत ठेका धराल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओमध्ये शेरा राजस्थानी फोक डान्सर्ससोबत डान्स करताना दिसत आहे. एवढंच नाही तर तो त्यांच्यासोबत गाणं गाताना देखील दिसत आहे. त्याचा हा अंदाज चाहत्यांना देखील फार आवडला आहे.