लग्नाच्या प्रश्नाला सलमान खानचं उत्तर

 सलमान कुठेही मुलाखतीसाठी आला की त्याला त्याच्या लग्नाबाबतचा प्रश्न आवर्जून विचारला जातो.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 24, 2018, 05:14 PM IST
लग्नाच्या प्रश्नाला सलमान खानचं उत्तर title=

मुंबई : संपूर्ण बॉलिवूड इंटस्ट्रीसह सलमानच्या चाहत्यांनाही सलमानच्या लग्नाचीच चिंता पडली आहे. त्यामुळे सलमान कुठेही मुलाखतीसाठी आला की त्याला त्याच्या लग्नाबाबतचा प्रश्न आवर्जून विचारला जातो.

सलमान खानचं गंमतीदार उत्तर

नुकत्याच एका मुलाखती दरम्यान सलमानला पुन्हा एकदा त्याच्या लग्नाशी संबंधित प्रश्न विचारला. यावर सलमान खानने गंमतीदार उत्तर देत जणू त्याच्या लग्नाच्या प्रश्नाला कायमचा पू्र्णविराम दिला आहे.

ही गोष्ट खूपच खर्चिक

लग्न ही गोष्ट खूपच खर्चिक झाली आहे. लग्नाचा खर्च लाखो-करोडोंमध्ये असतो. इतका खर्च मला परवडणार नाही. म्हणून मी अजून एकटा असल्याचं यावेळी सलमानने म्हटलं आहे.