Salman Khan Security : अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ

Salman Khan Security : धमकीनंतर अभिनेता सलमान (Salman Khan ) याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बिश्नोई टोळीच्या शार्पशूटरकडून धमकी मिळाल्यानंतर ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.  

Updated: Nov 1, 2022, 02:20 PM IST
Salman Khan Security : अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत वाढ title=

Salman Khan Security Increased : धमकीनंतर अभिनेता सलमान (Salman Khan ) याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. बिश्नोई टोळीच्या शार्पशूटरकडून (Lawrence Bishnoi threat to Salman Khan) धमकी मिळाल्यानंतर ही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. (Salman Khan has been given a Y+ security cover by the Maharashtra government) एका अहवालानुसार सलमान खान याला राज्य सरकारने Y+ सुरक्षा कवच दिले आहे. रॅपर सिद्धू मूसवालाच्या हत्येमागे असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अभिनेत्याला जीवाला धोका आहे. या सुरक्षेच्या कारणास्तव, महाराष्ट्र सरकारने अभिनेत्यांच्या सुरक्षेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे अभिनेता अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांच्या श्रेणीतील सुरक्षा कवच देण्यात आले आहे.

सलमानच्या सुरक्षेत CRPF चे 11 कमांडो असतील. सलमानच्या घराबाहेरही 5 पोलीस तैनात असतील. तर तीन शिफ्टमध्ये 6 जणांची पर्सनल सुरक्षा असेल...यासोबतच अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अनुपम खेर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. तर उद्योगपती मुकेश अंबानी यांनाही झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

यावर्षी जूनमध्ये सलमान खान आणि त्याचे वडील लेखक सलीम खान यांना धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. पंजाबमध्ये  हत्या झालेल्या गायकाचा संदर्भ असलेल्या सलमान आणि सलीम यांना 'मूसवाला' करण्याची धमकी या पत्रात देण्यात आली होती. यानंतर, मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील अनेक गुंडांना अटक केली, त्यापैकी अनेकांनी सलमानला टार्गेट केल्याची कबुली दिली होती.

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्तेमध्ये सहभागी असलेला आरोपी कपिल्याने पंजाब पोलिसांकडे खुलासा केला की शूटर संतोष सोबत तो मुंबईत राहून रेखी करत होता. आरोपी कपिल पंडित आणि महाराष्ट्राचा शार्प शूटर संतोष जाधव रेकी करण्यासाठी अनेक दिवस मुंबईत थांबले होते. कपिलवर पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा आरोप आहे. त्यानंतर सलमान याच्या घराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी देखील अभिनेता सलमान खान यांच्या सुरक्षेचा आढावा घेणार आणि सुरक्षित वाढ करण्याबाबत निर्णय घेतला.

गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर लॉरेन्स बिश्नोई यांचा सदस्य कपिल पंडित याने आणखी दोघांसह मुंबईत सर्वांच्या घरी जाऊन रेकी केली होती हे मान्य केले आहे. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो म्हणून पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान, सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना काही दिवसापूर्वी एक धमकीचे पत्र मिळाले होते. या पत्रात तुमचाही सिद्धू उसेवाला करू अशी धमकी दिली होती त्यानंतर ही सलमानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती.