सलमान म्हणजे मला पडलेलं एक वाईट स्वप्न; रिलेशनशिपमध्ये विश्वासघात पचवणाऱ्या ऐश्वर्याची पहिली प्रतिक्रिया

सलमानशी ब्रेकअप केल्यानंतर ऐश्वर्याने का मानले देवाचे आभार?

Updated: Jun 2, 2021, 12:24 PM IST
सलमान म्हणजे मला पडलेलं एक वाईट स्वप्न; रिलेशनशिपमध्ये विश्वासघात पचवणाऱ्या ऐश्वर्याची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : मैत्री-ओढ प्रेम आणि नंतर लग्न... रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या प्रत्येकाला याच परिस्थितीतून जावं लागतं. मात्र प्रेम आणि लग्न यातील मधला काळ थोडा कठीण असतो. याच काळात एकमेकांकडून अनेक अपेक्षा असतात. एक नातं याकाळात नव्याने जन्म घेत असतं. हा काळ जी जोडी निभावून नेईन ती जोडी भविष्यात एक उत्कृष्ठ जोडी म्हणून संसार करत असतो. असं काहींसोबत होतं तर काही जणांचं नातं या काळातच संपतं. 

सलमान - ऐश्वर्या यांचं खास नातं 

बॉलिवूडमधील एका जोडीचं नातं याच काळात टिकू शकलं नाही. पण आजही त्यांच्या प्रेमासोबतच ब्रेकअपची देखील चर्चा होते. ते म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं नातं. या दोघांच्या लव्हस्टोरीपासून ब्रेकअपपर्यंत अनेक किस्से ऐकायला मिळतील. नात्यात दुरावा येणं ही काही नवी गोष्ट नाही. पण ते नातं चुकीच्या पद्धतीने तुटणं हे त्रासदायक असतं. याचा परिणाम दोघांवरही होत असतो. आणि तो कायमच राहतो. प्रेम तर असतं मात्र ते पुढे लग्नाच्या नात्यापर्यंत पोहचत नाही. याचा त्रास सर्वाधिक असतो. 

ऐश्वर्याने कधी केलं सलमानसोबत ब्रेकअप?

27 डिसेंबर 2002 साली एका मुलाखतीत ऐश्वर्या रायने पहिल्यांदा सलमानसोबत आपण रिलेशनशिपमध्ये असल्याची गोष्ट स्विकारली होती. 'सलमान आणि माझं गेल्यावर्षी मार्च महिन्यात ब्रेकअप झालं. मात्र त्याने हे स्विकारलं नाही. ब्रेकअपनंतरही तो मला फोन करायचा, चुकीच्या गोष्टी बोलायचा. त्याला माझं सहकलाकारसोबत अफेअर असल्याची शंका होती. माझं नाव अभिषेक बच्चन ते शाहरूख खानसोबत जोडलं गेलं. सलमानने मला मारलं आणि शारीरिक खूप त्रासही दिला. अशा परिस्थितीत जेव्हा मी त्याचा फोन घेण्यास नकार दिला तेव्हा त्याने स्वतःला त्रास दिला.'

तेव्हा मी सलमान खानच्या वागणुकीवर शांत राहणं पसंत केलं. मात्र सलमानने, त्याच्या कुटुंबाने आणि मित्र परिवाराने मला आणि माझ्या कुटुंबाला कायमच त्रास दिला. मी त्या दोन वर्षात कायमच त्याचा साथ दिला आहे. पण त्याबदल्यात मला शिव्या-धोका आणि आक्रोशच मिळाला आहे. कोणत्याही स्वाभिमानी महिलेप्रमाणे मी त्याच्यासोबतचं नातं संपवलं. सलमान खान हे माझ्या आयुष्यातील एक वाईट स्वप्न आहे. मी देवाचे आभार मानते हे सगळं प्रकरण लवकर संपल. 

सलमान आणि ऐश्वर्या अशा पद्धतीने वेगळे होणारे पहिले बॉलिवू़ड कपल नाहीत. बॉलिवूडमध्ये अशा प्रकारे अनेक जोड्या एकमेकांपासून वेगळ्या झाल्या आहेत.