सलमान खान आणि यूलिया वंतूर यांच्यात ब्रेकअप ?

सध्याचं वातावरण पाहता सलमानचा स्टेटस पुन्हा सिंगल होणार असल्याची चिन्ह आहेत.  

Updated: May 10, 2018, 07:39 AM IST
सलमान खान आणि यूलिया वंतूर यांच्यात ब्रेकअप ? title=
मुंबई : सलमान खानसोबत अनेक अभिनेत्रींच नाव जोडल जात पण एक नाव अस आहे जे अनेक वर्षांपासून त्याच्याशी जोडल गेलय. ते नाव म्हणजे त्याची रशियन गर्लफ्रेंड यूलिया वंतूर. दोघांच्या लग्नाच्या बातम्याही काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या.या दोघांनीही सर्वांसमोर आपल्या नात्याचा स्वीकार केला नाही किंवा याबद्दल कधी विरोधही केला नाही. पण सध्याचं वातावरण पाहता सलमानचा स्टेटस पुन्हा सिंगल होणार असल्याची चिन्ह आहेत.  

सलमान पुन्हा सिंगल 

सलमानचे आपली गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसोबत खटकल्याचे वृत्त समोर आले आहे. आता ही केवळ चर्चाच आहे अस नाही. कारण यूलियाच्या पोस्टवरून तरी असच काहीस दिसतय. सलमान आणि तिच नात तुटणार असल्याच पोस्ट वाचून तरी वाटू लागलय. तिच्या इंस्टाग्रामची पोस्ट सध्या बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय आहे.  योग्य माणसाची निवड म्हणजे प्रेम अस समजून मी आयुष्यात खूप मोठी चूक केली. तुम्हाला ज्याच्यासोबत आयुष्य घालवायचंय अशा माणसाला शोधत राहू नका. असा मनुष्य बना ज्याच्यासाठी हे सर्व ब्रेकअपसारखेच असेल. 

जॅकलीनसोबत सलमान 

सोनम कपूरच्या लग्नात सलमान खान हा यूलिया वंतूरसोबत नाहीत तर जॅकलीन फर्नांडीससोबत पोहोचला होता. याठिकाणी मीडियाकडे दुर्लक्ष करत तो कॅटरीनाशी बोलताना दिसला.