सलीम खान यांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव' पुरस्कार प्रदान

सलीम खान व्यतीरीक्त अनेक दिग्गज कलाकारांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आले 

Updated: Apr 25, 2019, 11:11 AM IST
सलीम खान यांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव' पुरस्कार प्रदान title=

मुंबई : राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बॉलिवूडचे प्रसिद्ध पयकथा लेखक आणि अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खआन यांना ७७व्या  मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सलीम खान यांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' 'जीवन गौरव पुरस्कार'ने गौरविण्यात आले. सलीम खान व्यतीरीक्त अनेक दिग्गज कलाकारांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आले 

बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवलेली नृत्यांगणा हेलन यांना सुद्धा मास्टर दीनानाथ पुरस्काराने सन्मनित करण्यात आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना सुद्धा प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरून सलीम खान, हेलन आणि मधुर भंडारकर यांचे फोटो पोस्ट केले आहेत. 

दीनानाथ मंगेशकर हे सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर यांचे वडील आहे. ते एक प्रसिद्ध कलाकार, नाट्य संगीतकार आणि शास्त्रीय गायक होते. मास्टर दीनानाथ यांच्या स्मृती जपण्यासाठी मंगेशकर कुटुंबामार्फत मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो.