सैफवर भडकली काजोल, फसवणुकीचा आरोप

जोल सध्या तिच्या आगामी 'तान्हाजी' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे.

Updated: Dec 30, 2019, 07:24 PM IST
सैफवर भडकली काजोल, फसवणुकीचा आरोप  title=

मुंबई : अभिनेत्री कजोल सध्या तिच्या आगामी 'तान्हाजी' चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. 'तान्हाजी' चित्रपटाच्या माध्यमातून अजय आणि काजोल एकत्र भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटामध्ये देखील ती अजयच्या पत्नीची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमधील अजय आणि काजोलच्या अभिनयाचे कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे. 

सध्या रीयल लाईफमधील ही जोडी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान ती अभिनेता सैफ अली खानवर चांगलीच भडकली आहे. काजोलने ट्विटरच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला.

You betrayed me in Omkara and now during promotions also… hope u read this in Switzerland #Saifalikhan pic.twitter.com/kKnecdKOg9

— Kajol (@itsKajolD) December 30, 2019

अजय आणि सैफचा फोटो पोस्ट करत काजोलने कॅप्शनमध्ये सैफला चांगलेच सुनावले आहे. ती म्हणाली, 'तू मला 'ओमकारा'मध्ये देखील फसवलं होतं. तसंत आता प्रमोशनमध्ये देखील फसवत आहेस. आशा करते तू हे स्वित्झर्लंडमध्ये वाचत असशील.'  

अशा विनोदी अंदाजात काजोलने सैफवर निशाना साधला आहे. सैफ अली खान, करिना कपूर खान आणि तैमूर नववर्षाचे स्वागत स्वित्झर्लंडमध्ये करणार आहेत. नववर्षाचे दमदार स्वागत करण्यासाठी ते स्विझरर्लंडमध्ये पोहोचले आहेत. शिवाय करिनाने त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत. 

तर, काजोल या चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. तान्हाजी चित्रपटात काजोलवर एक भव्य दिव्य असं गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. अजय देवगणसोबतच सैफ अली खान महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

त्याचबरोबर शरद केळकर, आणि पंकज त्रिपाठी देखील झळकणार आहेत. ऐतिहासिक कथेवर आधारलेला 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' १० जानेवारी २०२० रोजी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता पाहायला मिळत आहे.