गरीब मुलींसोबत सैफचा मुलगा जे वागला... असं क्वचितच सेलिब्रिटी वागले असतील

इब्राहिमचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.

Updated: Mar 19, 2022, 07:31 PM IST
 गरीब मुलींसोबत सैफचा मुलगा जे वागला... असं क्वचितच सेलिब्रिटी वागले असतील title=

मुंबई : सैफ अली खानचा लाडका मुलगा इब्राहिम अली खान हा अशा स्टार किड्सपैकी एक आहे ज्याने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले, तरीही तो सतत सोशल मीडियावर चर्चेत असतो. इब्राहिमचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.

आता होळीच्या निमित्ताने इब्राहिमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये काही गरीब मुलं इब्राहिमकडे पैसे मागताना दिसत आहेत, पण यावेळी इब्राहिमकडे त्यांना देण्यासाठी पैसे नसतात, त्यामुळे तो त्यांना कोणतीही मदत करु शकत नसल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, इब्राहिम रस्त्यात एका मित्रासोबत उभा आहे, यावेळी काही लहान मुलं तिथे येतात आणि त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इब्राहिम खिशात पैसे आहेत का ते पाहतो, पण त्याच्याकडे पैसे नसतात. नंतर तो मित्राला विचारतो, पण मित्राकडेही पैसे नसतात. शेवटी, इब्राहिम या मुलांच्या जवळ जाऊन त्यांना पैसे नसल्याचं सांगतो.

यावेळी इब्राहिमने त्यांची माफी देखील मागितल्याचं बोललं जात आहे. इब्राहिमचं हे वागणं अनेकांचं लक्ष वेधून घेणारं ठरत आहे.