Shraddha आणि Ranbir Kapoor चा रोमॅन्टिक व्हिडिओ लीक

दोघंही सध्या दिल्लीत आहेत. जिथून काही व्हिडिओ लीक झाले आहेत.

Updated: Mar 19, 2022, 07:07 PM IST
Shraddha आणि  Ranbir Kapoor चा रोमॅन्टिक व्हिडिओ लीक title=

मुंबई : बॉलीवूडचा 'संजू' रणबीर कपूरचे चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप दिवसांपासून उत्सुक आहेत. लवकरच अभिनेता काही मोठे प्रोजेक्ट्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  'ब्रह्मास्त्र' आणि 'शमशेरा'साठी हेडलाइन्समध्ये आल्यानंतर रणबीर आता लव रंजनच्या आगामी अनटाइटल्ड प्रोजेक्टसाठी चर्चेत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असून रणबीरचा तिच्यासोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे. विशेष म्हणजे दोघंही सध्या दिल्लीत या सिनेमाचं शूटिंग करत आहे. जिथून काही व्हिडिओ लीक झाले आहेत.

श्रद्धा आणि रणबीर दिसले डान्स करताना
लव रंजन या चित्रपटातील श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरच्या डान्स सिक्वेन्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिनेमात एक लग्नाचा मंडप उभारण्यात आला आहे, ज्यात एक भव्य ठिकाणी शूट केलं जात आहे. आणि यामध्ये बरेच बॅकग्राउंड डान्सरदेखील दिसत आहेत. दोघंही या व्हिडिओत टेरेसवर रोमँन्टिक अंदाजात दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

असा आहे दोन्ही स्टार्सचा लूक
व्हिडिओमध्ये रणबीर निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर श्रद्धा पिवळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. श्रद्धाने तिचे केस ओपन ठेवले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रणबीर आणि श्रद्धाच्या केमिस्ट्रीची झलकही दिसत आहे.