'लाल कप्तान'चं विश्व उलगडतोय चित्रपटाचा दुसरा ट्रेलर

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) बहुप्रतिक्षित 'लाल कप्तान' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर  आहे. याआधी चित्रपटाच्या पहिल्या पार्टचा ट्रेलर 'चॅप्टर वन- द हंट' या नावाने प्रदर्शित करण्यात आला होता. आता दुसरा ट्रेलर 'चॅप्टर टू- द चेज' या नावाने प्रदर्शित करण्यात आला आहे. 

Updated: Sep 28, 2019, 03:52 PM IST
'लाल कप्तान'चं विश्व उलगडतोय चित्रपटाचा दुसरा ट्रेलर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) बहुप्रतिक्षित 'लाल कप्तान' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर  आहे. याआधी चित्रपटाच्या पहिल्या पार्टचा ट्रेलर 'चॅप्टर वन- द हंट' या नावाने प्रदर्शित करण्यात आला होता. आता दुसरा ट्रेलर 'चॅप्टर टू- द चेज' या नावाने प्रदर्शित करण्यात आला आहे. 

'चॅप्टर टू- द चेज' हा दुसरा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळपास दीड मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सैफचा क्लोजअप शॉट, कपाळावर लाल टीळा, काजळ आणि चेहऱ्यावर लावलेलं भस्म लूक प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय.

'लाल कप्तान'मधून सैफ अली खान एका नव्या, वेगळ्याच रुपात पाहायला मिळतोय. 'लाल कप्तान' (Laal kaptaan) १० ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात 'नागा साधू' असं सैफच्या व्यक्तीरेखेचं नाव आहे. नवदीप सिंह यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन तर आनंद एल रायने चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

'लाल कप्तान' दमदार ट्रेलरनंतर आता सैफचा हा तगडा लुक, त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.