दोन महत्त्वाच्या व्यक्तींसोबत रणबीरने साजरा केला वाढदिवस

त्याच्या वाढदिवसाचे काही फोटो व्हायरल 

Updated: Sep 28, 2019, 02:28 PM IST
दोन महत्त्वाच्या व्यक्तींसोबत रणबीरने साजरा केला वाढदिवस  title=
छाया सौजन्य- ट्विटर

मुंबई : सेलिब्रिटींचा वाढदिवस म्हटलं की कलावर्तुळासोबतच चाहत्यांचा उत्साहसुद्धा शिगेला असतो. याच उत्साहाचं वातावरण सध्याही पाहायला मिळत आहे, याला निमित्त आहे, ते म्हणजे अभिनेता रणबीर कपूर याच्या वाढदिवसाचं. चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या अभिनेत्यावर तरुणींचं विशेष प्रेम. अशा या रणबीरने त्याचा यंदाचा वाढदिवस कोणासोबत साजरा केला ठाऊक आहे? 

वाढदिवस म्हटलं की आलं धमाकेदार सेलिब्रेशन. पण, कायमच काही निवडक व्यक्तींच्या वर्तुळात वावरणाऱ्या रणबीरने त्याचा हा खास दिवसही अशाच काहीशा पद्धतीने साजरा केला आहे. काही खास आणि निवडक मित्रांच्या साथीने त्याने आयुष्यातील दोन अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींसोबत हा दिवस साजरा केला. 

रणबीरच्या जीवनातील त्या दोन महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे त्याची आई, नीतू सिंग आणि प्रेयसी, अभिनेत्री आलिया भट्ट. 'फिल्मफेअर'च्या इन्स्टाग्रामवरुन या क्षणांचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये आलिया आणि नीतू या दोघींसोबत रणबीर फार आनंदात दिसत आहे. 

मुख्य म्हणजे या दोघींनीही रणबीरला या खास दिवसाच्या तितक्याच खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाने रणबीरचा आफ्रिकन जंगल सफारीदरम्यानचा फोटो शेअर करत, 'हॅपी बर्थडे ....यू' असं लिहिलं आहे. तर, रणबीरच्या आईने म्हणजेच नीतू सिंग यांनी त्याच्या जुन्या वाढदिवसांचे फोटो शेअर करत काही आठवणींना उजाळा दिला. 

 
 
 
 

A post shared by Alia  (@aliaabhatt) on

रणबीर आपली ताकद असल्याचं म्हणत, तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरतो हे पाहून त्यांनी त्याला खूप सारे शुभाशीर्वाद दिले आहेत. रणबीरचे हे जुने फोटो पाहताना, एकेकाळी त्याचा वाढदिवस नेमका कसा साजरा केला जात असे याचाही अंदाज लावता येत आहे.