'त्यापेक्षा लाजिरवाणं काहीही नाही...' एका घटनेनंतर Saif Ali Khan व्यक्त

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता असूनही सैफ अली खानला एका गोष्टीची वाटते लाज...   

Updated: May 30, 2022, 09:15 AM IST
'त्यापेक्षा लाजिरवाणं काहीही नाही...' एका घटनेनंतर Saif Ali Khan व्यक्त title=

मुंबई : अभिनेता सैफ अली खानने अनेक सिनेमांमध्ये वेग-वेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सैफ. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि चाहत्यांच्या मनात स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी सैफने अनेक भूमिका साकारल्या. सैफने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. मात्र, स्वत: सैफला त्याने साकारलेल्या भूमिकेची आजही लाज वाटते.
 
सैफ अली खान वेगवेगळ्या भूमिका साकारण्यापासून कधीच मागे हटत नाही. त्याला प्रत्येक वेळी वेगळ्या भूमिका करायला आवडतात. नेहमी विनोदी तर कधी तडफदार भूमिकेत दिसणाऱ्या सैफने एका सिनेमात स्त्रीची देखील भूमिका साकारली. 

साजिद खानचा  2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हमशकल्स'मध्ये सैफ अली खान, राम कपूर आणि रितेश देशमुख यांनी तिहेरी भूमिका साकारल्या होत्या. एका तिहेरी भूमिकेत राम, सैफ आणि रितेश यांना महिलेच्या गेटअपमध्ये राहावे लागले.

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान, सैफने साजिद खानला त्याच्या लुकसाठी दोष दिला आहे. मुलाखती दरम्यान जेव्हा सैफला त्याच्या काभी जुन्या भूमिकांबद्दल आठवण करुन दिली, तेव्हा सैफला धक्का बसला.

तो म्हणाला, 'साजिदने आमच्यासोबत हे काय केलं होतं. त्या भूमिकेमुळे मला आजही लाजिरवाणं वाटतं.' तेव्हा स्त्री भूमिकेत दिसल्यानंतर सर्वत्र सैफच्या लूकची चर्चा होती. 

दरम्यान 'हमशकल्स' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र, त्यावर समीक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. 

सैफच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झाले तर, तो लवकरच 'विक्रम वेधा' आणि 'आदिपुरुष'मध्ये दिसणार आहे.