'तो माझ्या जवळ...', अभिनेत्रीच नाही तर अभिनेतेही करतात Casting Couch चा सामना

Actor नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा धक्कादायक खुलासा केला आहे. या अभिनेत्यानं छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. 

Updated: Nov 27, 2022, 02:20 PM IST
'तो माझ्या जवळ...', अभिनेत्रीच नाही तर अभिनेतेही करतात Casting Couch चा सामना title=

मुंबई : बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीबद्दल अनेक मोठी आणि धक्कादायक गुपिते उघड केली आहेत आणि त्यांच्यासोबत होणाऱ्या कास्टिंग काऊचबद्दल खुलासे केले आहेत. आता बॉलिवूड अभिनेता परम सिंहन (Param Singh) कास्टिंग काउचचा (Casting Couch) धक्कादायक खुलासा केला आहे. परम सिंहनं 'सड्डा हक' (Sadda Haq) आणि 'इश्क पर जोर नहीं' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. यावरून फक्त अभिनेत्री नाही तर अभिनेतेही कास्टिंग काऊचचा शिकार होतात हे दिसून आले आहे. 

'सड्डा हक' फेम परम सिंगनं आता छोट्या पडद्याला रामराम करत थिएटरकडे वळला आहे. याशिवाय तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही काही प्रोजेक्ट्स करत आहे. 'न्यूज 18' ला दिलेल्या मुलाखतीत परम सिंग त्याला आलेल्या कास्टिंग काऊचविषयी बोलला. सुरुवातीला मला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला. कामाच्या संदर्भात मी एकदा कास्टिंग डायरेक्टरला भेटायला गेलो होतो. यादरम्यान त्यानं माझ्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तो माझ्या जवळ येताना पाहून मी त्याला ढकललं. मी त्याला धक्काबुक्की केली आणि मी त्याच्या जवळच होतो. त्याला मारणार इतक्यात मला वाटलं की तो घाबरला आहे. मला स्वतःला कसं सांभाळायचं हे माहित आहे आणि या प्रकारच्या परिस्थितीला बळी पडलेल्या लोकांबद्दल कुठेतरी खेद वाटतो. मला वाटतं प्रत्येकानं अशा घृणास्पद कृत्यांसाठी भूमिका घेतली पाहिजे. 

परम 10 वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे.

परम गेल्या 10 वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. पण आज तो ज्या पदावर आहे त्यावर तो समाधानी नाही. तो म्हणाला, 'मी समाधानी नाही कारण मी आज जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी मी खूप लांब पल्ला गाठला आहे. मला माझ्या क्षेत्रात अधिक शोध घ्यायचा आहे, मला माझी कला आणखी परिष्कृत करायची आहे. मी सर्वसाधारणपणे आणखी आव्हानांची अपेक्षा करतो. असं असलं तरी, मी केलेल्या कामाबद्दल आणि मी जे काही साध्य केले त्याबद्दल कृतज्ञ आहे.'

हेही वाचा : Drishyam 2 Movie: दृश्यम 2 चित्रपटानं आत्तापर्यंत केली कोट्यवधींची कमाई, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट्स

परमनं आपल्या करिअरची सुरुवात जाहिरातींमधून केली, त्यानंतर त्यानं 'परवरिश' मध्ये छोटी भूमिका साकारली. मात्र 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सड्डा हक' या टीव्ही शोमधून त्याला ओळख मिळाली. यानंतर त्यानं 'ब्लॅक कॉफी', 'टडप' आणि 'चीटर' यांसारख्या वेब सीरिजशिवाय 'गुलाम', 'हवाईं' आणि 'इश्क पे जोर नहीं' सारख्या मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या, तो त्याच्या नवीन थ्रिलर वेबसीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, या वेबसीरिजचं नावं अजून समोर आलेलं नाही.