Sara Tendulkar चा जडला विवाहित अभिनेत्यावर जीव, अखेर सगळ्यांसमोर प्रेमाची कबूली

साराच्या सौंदर्यासमोर बॉलिवूडमधील सौंदर्यवतीही फेल आहेत. सारा तेंडुलकरला सचिनसारखे साधे आयुष्य जगायला आवडते.

Updated: Mar 25, 2022, 09:59 PM IST
Sara Tendulkar चा जडला विवाहित अभिनेत्यावर जीव, अखेर सगळ्यांसमोर प्रेमाची कबूली title=

मुंबई : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते. नुकतेच तिने मॉडलिंगमध्ये पदार्पण केलं आहे. ज्यानंतर तिचं खुप कौतुक देखील करण्यात आलं. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते आणि ती सोशल मीडियावर काही ना काही अपडेट करत असते. तिचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत आणि त्यांना सारा तिच्या खासगी आयुष्यात काय करते? हे जाणून घ्यायला फार आवडते. त्यामुळेच ती नेहमी चर्चेत असते.

साराच्या सौंदर्यासमोर बॉलिवूडमधील सौंदर्यवतीही फेल आहेत. सारा तेंडुलकरला सचिनसारखे साधे आयुष्य जगायला आवडते. सारा अनेक वेळा कुटुंबासोबत स्पॉट झाली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सारा तेंडुलकरला विचारण्यात आले की, तिला कोणता बॉलीवूड अभिनेता आवडतो, तेव्हा तिने कोणताही विचार न करता एका अभिनेत्याचे नाव घेतले, तसेच तिला तो किती आवडतो आणि ती त्याच्यासाठी किती वेडी आहे, हे देखील तिने सांगितले.

सारा तेंडुलकर म्हणाली की, मला रणवीरचा अभिनय आणि त्याची बॉडी लॅग्वेज, त्याची स्टाईल मला खूप आवडते. सारा तेंडुलकर पुढे म्हणाली की, मी रणवीरची खूप मोठी फॅन आहे, ज्यामुळे त्याचा कोणताही सिनेमा आला तरी मी त्याला पाहायला पहिल्याच दिवशी सिनेमागृहात जाते. 

साराच्या या उत्तरावरुन तिचं रणवीर सिंगवरती किती प्रेम आहे आणि ती त्याची किती मोठी फॅन आहे हे स्पष्ट झालं आहे. साराने रणवीर सिंग सोबत एक फोटो देखील काढला आहे.

पूर्वी, सारा तेंडुलकर बॉलीवूडमध्ये काम करेल अशी चर्चा होती, परंतु जेव्हा सचिनला याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला आणि सांगितले की, ही सर्व अफवा आहे. ज्या क्षेत्रात तिला करिअर करायचे आहे, त्यात सारा आपले करिअर करणार आहे.