विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये 'सारा'वर खिळल्या सर्वांच्या नजरा...

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मंगळवाऱी मुंबईत लग्नाच्या ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन केले होते.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 27, 2017, 10:59 AM IST
विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये 'सारा'वर खिळल्या सर्वांच्या नजरा... title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मंगळवाऱी मुंबईत लग्नाच्या ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शन पार्टीला क्रिडा आणि बॉलिवूड विश्वातील मान्यवर उपस्थित होते. 
यात क्रिकेटचा देव म्हणजे चक्क मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने हजेरी लावली. तो त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा सोबत आला होता.

सारावर खिळल्या नजरा 

अंजलीने पारंपारीक सलवार सूट घातला होता. तर सचिन काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसला. तर साराचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला. तिने व्हाईट रंगाचा शॉर्ट फ्रॉक घातला होता. त्याला साजेसे व्हाईट ईअरिंग्स देखील घातले होते. ती हा सुंदर लूक लक्षवेधी ठरला. नेहमीप्रमाणेच सुंदर दिसणाऱ्या सारावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

क्रिकेटविश्व लोटलं...

सचिनबरोबरच एमएस धोनी, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, हरभजन सिंग, युवराज सिंग, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, उमेश यादव, आर. अश्विन आणि ईशांत शर्मा या क्रिकेटर्सनी रिसेप्शनला हजेरी लावली. तसंच टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आशीष नेहरा, वीरेंद्र सहवाग, झहीर खान, अनिल कुंबळे, सुनील गावसकर आणि संदीप पाटिल हे देखील उपस्थित होते.