दोन दिवसांत सचिनच्या सिनेमाने केलीये १७.६० कोटींची कमाई

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित सचिन : अ बिलियन ड्रीम्स हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय.

Updated: May 28, 2017, 04:29 PM IST
दोन दिवसांत सचिनच्या सिनेमाने केलीये १७.६० कोटींची कमाई title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारित सचिन : अ बिलियन ड्रीम्स हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय.

शुक्रवारी २६ मेला हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर दोन दिवसांत या सिनेमाने १७.६० कोटींची कमाई केलीये.

प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या सिनेमाने ८.४० कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी ९.२० कोटी कमावले. दोन दिवसांत या सिनेमाने १७.६० कोटी रुपये कमावलेत. 

सचिनचा हा सिनेमा मराठी, हिंदी भाषांसह इतर भाषांमध्ये एकाचवेळी प्रदर्शित करण्यात आलाय.