मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स' हा चित्रपट 26 मे, 2017 रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाला सर्वच वयोगटातील चाहत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
हा सिनेमा ब्रिटिश फिल्म निर्माता जेम्स अॅर्स्किन यांनी लिखित आणि निर्देशित केलेला डॉक्यू ड्रामा आहे. 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स या सिनेमाने पहिल्या दिवसात चांगली कमाई केली आहे.
सचिन तेंडुलकरच्या जीवनावर हा सिनेमा असल्याने चाहत्यांनी पहिल्याच दिवशी शो पाहण्यासाठी गर्दी केलेली दिसून येत आहे. याबाबत प्रसिध्द चित्रपट समीक्षक आणि विश्लेषक तारन आदर्श यांनी ट्विट केलेय. पहिल्या दिवशी सिनेमाने ८.४० कोटी रुपयांचा गल्ला जमवलाय.
Considering it's a docu-drama, #SachinABillionDreams opens IMPRESSIVELY... Fri ₹ 8.40 cr. India biz [Hindi, Marathi, Tamil, Telugu, English]
— taran adarsh (@taran_adarsh) May 27, 2017
या सिनेमाची भुरळ सर्वांनाच पडली आहे. सचिनच्या जीवनातील काही गोष्टी उलगडण्यास मदत झालेय. तसेच वास्तविक जीवनातील घटनांची झलक दिसू लागली आहे, त्यामुळे सचिन तेंडुलकरच्या चाहत्यांवर चांगलाच प्रभाव पडलाय. महाराष्ट्र, ओडिशा, केरळ आणि छत्तीसगढमध्ये या चित्रपटाला करमुक्त कर घोषित करण्यात आले आहे.