'इतरांच्या आयुष्यात...', हृतिकपेक्षा 12 वर्षं लहान सबा आझादनं पहिल्यांदाच नात्यावर केलं भाष्य

Saba Azad Speaks on Relationship With Hrithik Roshan : सबा आझद आणि हृतिक रोशन यांनी काही काळापूर्वी त्यांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहिर केले होते. त्या दोघांमध्ये असलेला 12 वर्षांचा फरक हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. आता सबानं त्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 24, 2023, 07:22 PM IST
'इतरांच्या आयुष्यात...', हृतिकपेक्षा 12 वर्षं लहान सबा आझादनं पहिल्यांदाच नात्यावर केलं भाष्य title=
(Photo Credit : Social Media)

Saba Azad Speaks on Relationship With Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हे दोघे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अनेकदा ते वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असल्याचे आपण पाहतो. दिग्दर्शक करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान, हृतिक आणि सबाने त्यांच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली. हृतिक आणि सबा नावाची नुकतेच अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथे सुट्टीवर गेले होते. त्यांनी त्यांच्या सहलीचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. पण त्या दोघांना नेहमीच सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यावर कधीही न बोलणारे हृतिक आणि सबा आता शांत राहिले नाही. सबा आझादनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मात्र, त्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

सबा आझादनं नुकतीच 'न्यूज 18' मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत सबानं तिच्या लव्ह लाईफवर वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीत सबाला तिच्या लव्ह लाईफबद्दल विचारण्यात आले, ज्यावर उत्तर देत सबा आझाद म्हणाली, 'अशा गोष्टींचा सामना कोण करत नाही? प्रत्येकजण स्वतःच्या संघर्षांना तोंड देतो. पण मला असं वाटते की हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. लोकांना इतरांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्यात जास्त रस असतो. आपण त्याबद्दल काय करू शकतो? फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर कोणताही परिणाम होऊ देऊ नका. हसत राहा आणि पुढे जा. या फार लहान गोष्टी आहेत व मी करत असलेल्या कामाचा एक भाग आहे. हा माझ्या जीवनाचा एकच भाग. मला माझा कामांमधून सार्वजनिक ठिकाणी बोलायला आवडतं त्याशिवाय कोणत्याही दुसऱ्या गोष्टींविषयी बोलायला आवडतं नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सबा आझाद आणि हृतिक रोशन यांच्या अर्जेंटिनाच्या सहलीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या दोघांनी सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहे. त्या दोघांची त्यात असलेली बॉन्डिंग अनेकांना भाळली आहे तर अनेकांना आवडली नाही. या दरम्यान, सबानं हृतिकसोबतचा कॅफेमध्ये पाहिलं होतं. तिथलाच हृतिक रोशनसोबतचा एक सेल्फी सबानं शेअर केला होता. या सेल्फी शेअर करत तिनं ‘माय हिप्पो हर्ट’, असं कॅप्शन दिलं होतं.

हेही वाचा : होय! बरोबर ऐकलात, आता चांद्रयान 3 वर सुद्धा चित्रपट काढणार अक्षय कुमार...

सबाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'रॉकेट बॉईज 2' या चित्रपटात दिसली होती. तर हृतिक लवकरच 'फाइटर' या चित्रपटात दिसणार आहे.