२२ वर्षांनी पुन्हा ऋषी कपूर जुहीला म्हणणार, 'तू मेरी चाँदनी'

 'जादू', 'साजन का घर', 'इना मिना डीका', 'बोल राधा बोल' यासारख्या अनेक हीट सिनेमांच्या यादीत जी जोडी हिट ठरली.

Updated: Sep 17, 2018, 10:28 PM IST
२२ वर्षांनी पुन्हा ऋषी कपूर जुहीला म्हणणार, 'तू मेरी चाँदनी' title=

मुंबई : 'जादू', 'साजन का घर', 'इना मिना डीका', 'बोल राधा बोल' यासारख्या अनेक हीट सिनेमांच्या यादीत जी जोडी हिट ठरली. ती आता पुन्हा एकदा एक हिट सिनेमा देण्यासाठी सज्ज झालीय. ऋषी कपूर आणि जुही चावला ही जोडी तब्बल २२ वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

हितेश भाटीया दिग्दर्शित कौटुंबिक सिनेमात ही जोडी दिसणार आहे. याचं चित्रीकरणही सुरु झालं. अद्याप सिनेमाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. 

एक काळ सिल्व्हर स्क्रीन गाजवलेल्या या जोडीला पुन्हा एकदा ऑन स्क्रीन पाहण्यासाठी, त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता निश्चितच वाढली आहे.