मुंबई : कोरोना महामारीमुळे अनेक दिग्गज कलाकारांना आपले प्राण गमवावे लागले. अशात सोशल मीडियावर कलाकारांच्या मृत्यूच्या अफवा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल अशी बातमी ऐकल्यानंतर चाहत्यांना मोठा बसतो. कोरोना काळात अनेक अफवा कानावर येत आहेत, अशात गेल्या काही दिवसांपासून मीनाक्षी शेषाद्री यांच्या निधनाची अफवा पसरत असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पण त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना काहीही झालेलं नाही. असं समजतं आहे.
तर मीनाक्षी शेषाद्री यांच्या निधनाची अफवा पसरण्यामागे एक कारणं आहे. 1 मे रोजी टीव्ही चॅनेल इंडिया टीव्हीवर, ' तलाश एक सितारे की' कार्यक्रम प्रसारित झाला होता. हा पूर्ण कार्यक्रम 80 ते 90 च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांच्यावर आधारित होता. ज्यामध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि एकाएकी अदृष्य झाल्या.
आता शोची संपूर्ण टीम मीनाशी यांचा शोध घेत आहे. त्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी मीनाशी यांच्या कुटुंबाची आणि मित्र परिवाराची मदत घेतली जात आहे. मीनाशी यांनी 'जंग', 'घातक', 'दामिनी', 'लव मॅरिज' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण 'घातक' चित्रपटानंतर त्यांनी बॉलिवूडचा निरोप घेतला. त्यांनी एका बँकरसोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर त्या अमेरिकेत राहतात. सध्या त्या अमेरिकेत वेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. शिवाय त्यांनी कोणालाही मुलाखत देण्यास नकार दिला आहे.