Rubina Dilaik Pregnant News : अभिनेत्री रुबिना दिलीक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या गरोदर असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. खरंतर रुबिनने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांच्या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा बेबी बंप दिसत आहे. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.
आता हिंदुस्तान टाइम्सने सूत्राचा अहवाला देत लिहिलं आहे की, 'अभिनेत्री चार महिन्यांची गर्भवती आहे. हे खरं आहे की, रुबिना आणि अभिनव त्यांच्या पहिल्या बाळाची प्लानिंग करत आहेत. रुबिना ही चार महिन्यांची गर्भवती असून पुढील वर्षाच्या सुरुवातीला तिची प्रसूती होणार आहे.
रुबिना मातृत्वाबद्दल खूप आनंदी आणि उत्साही आहे. हे जोडपं त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खाजगी आहे. आणि या कारणास्तव तिला तिची प्रेग्नंसी स्पॉटलाइटपासून दूर ठेवायची आहे. आणि एकांतात या नवीन टप्प्याचा आनंद घ्यायचा आहे. प्रसिद्धीपासून दूर राहण्याचं एक कारण म्हणजे अभिनेत्री मोठ्या सुट्टीसाठी अमेरिकेला गेली आहे.
काही काळापूर्वी, अभिनेत्री प्रसूती क्लिनिकच्या बाहेर दिसली होती.
अशी माहिती आहे की, रुबिना डिलाईकने अभिनेता अभिनव शुक्लासोबत लग्न केलं होतं. दोघंही खूप आनंदी आहेत आणि तिचं वैवाहिक जीवन एन्जॉय करत आहेत. हे कपल बिग बॉस 14 मध्ये सहभागी झालं होतं. या शोमध्ये रुबिनाने तिच्या आणि अभिनवमध्ये मतभेद झाल्याचा खुलासा केला होता. तिचं नातं इतकं टोकाला गेलं होतं की त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बिग बॉसने दोघांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि दोघंही पुन्हा एकत्र आले. रुबिना दिलीक या सिझनची विजेती ठरली. तिच्या कणखर व्यक्तिमत्त्वाचं चाहत्यांनी खूप कौतुक केलं आणि प्रेमाचा वर्षावही केला होता.
21 जून 2018 रोजी दोघांचे लग्न झाले होते. रुबिना अनेकदा पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. रुबिनाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत आणि ती तिच्या चाहत्यांना तिच्या नवीनतम फोटोंद्वारे मनोरंजन करत असते.