दाक्षिणात्य चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

Allu Arjun च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी...

Updated: Dec 10, 2022, 06:34 PM IST
दाक्षिणात्य चित्रपटांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!  title=

Allu Arjun and Ram Charan In Pushpa 2 : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुन हा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटामुळे प्रकाश झोतात आला होता. या चित्रपटानं प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटाच्या यशानंतर, निर्मात्यांनी त्याचा दुसरा भाग 'पुष्पा 2' (Pushpa 2) ची घोषणा केली, ज्याची तयारी जोरात सुरू आहे. अल्लू अर्जुन लवकरच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. पण याच दरम्यान एक मोठी बातमी समोल आली आहे ज्यामुळे प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत होऊ शकतो. 

'पुष्पा 2' मध्ये दिसणार रामचरण?

दिग्दर्शक सुकुमार 'पुष्पा 2' ला पहिल्या भागापेक्षा मोठा बनवण्यात कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत, त्यामुळेच चित्रपटाच्या शूटिंगलाही विलंब होणार असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय या चित्रपटात अनेक मोठे स्टार्स दिसणार असल्याचीही चर्चा सुरु असल्याचे म्हटले जात आहे, दरम्यान या चित्रपटाबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे,

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'पुष्पा चित्रपटाचे दिगदर्शक सुकुमार त्याच्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'रंगस्थलम' या चित्रपटाचा लीड स्टार म्हणजेच राम चरणची या चित्रपटात पाहूण्या कलाकाराची भूमिका देणार आहेत. ही बातमी राम चरण (Ram Charan) आणि अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी आनंदाची आहे. दरम्यान, अजून या चित्रपटाच्या निर्मात्यांनी किंवा टीमनं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हेही वाचा : Urfi Javed च्या अंगावर एकही कपडा नाही; शरीरावर चक्क गुंडाळली सायकलची चैन

 'पुष्पा 2' या पॅन इंडिया चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दोन बडे स्टार्स एकत्र चित्रपटाच्या पडद्यावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. राम चरण या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'RRR' चित्रपटामुळे खूप चर्चेत आला. आता 'पुष्पा' स्टार अल्लू अर्जुन आणि 'आरआरआर' फेम  राम चरणला एकत्र पाहण्याचा प्रेक्षक आतुर आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandana) 'पुष्पा 2' मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात राम चरण दिसला तर त्याची पाहुण्या कलाकाराची भूमिका असणार आहे. 2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.