रोहित शेट्टीला भेटला नवा 'अजय देवगन'! इशारा देत दिग्दर्शक म्हणाला...

रोहित शेट्टीचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'सिंघम अगेन' चित्रपटगृहात सुरु असतानाच त्या चित्रपटाच्या एका पात्रावर वेगवेगळे चित्रपट बनवायचं प्लॅनिंग सुरू रोहित शेट्टीने सुरु केले आहे.  

Intern | Updated: Nov 9, 2024, 02:24 PM IST
रोहित शेट्टीला भेटला नवा 'अजय देवगन'! इशारा देत दिग्दर्शक म्हणाला...  title=

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ हा जॅकी श्रॉफ यांचा मुलगा आहे. याने  2014 मध्ये 'हिरोपंती' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि नुकताच प्रदर्शित झालेला 'सिंघम अगेन' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. टायगर श्रॉफ 'सिंघम अगेन'च्या यशाचा आनंद घेत आहे . या चित्रपटात  टायगर श्रॉफची छोटी भूमिका असली तरी सुद्धा प्रेक्षकांनी त्याने साकारलेल्या व्यक्तीरेखेला भरभरून प्रेम देत दिलं आहे. पोलिसांच्या या दुनियेत अनेक अभिनेत्यांनी काम केले पण टायगर श्रॉफ हा पहिल्यांदाचं या व्यक्तीरेखेत दिसला आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली प्रदर्शित झालेला या चित्रपटामुळे टायगर श्रॉफला असे चित्रपट मिळण्याची शक्यता आहे. टायगरनं भविष्यात 'सत्या' या पात्रावर एकतरी चित्रपट येईल अशी शक्यता वर्तवली आहे.  

टायगर श्रॉफला रोहित शेट्टीने योजना कशी केली हे माहित नाही पण त्याला आशा आहे. टायगर श्रॉफ म्हणाला, मला नविन आवृत्तीचा भाग बनण्याची संधी मिळाली आहे. मला या चित्रपटासोबत  मिळणाऱ्या प्रेम आणि प्रसंशाचा मला खरोखर आनंद वाटत आहे. मला वाटते की एक चित्रपट तरी 'सत्या' या पात्रावर असेल कधी ते माहित नाही ते रोहित शेट्टीवर अवलंबून आहे. त्यांना असे वाटते की यावर काम सुरू करण्याची हीचं योग्य वेळ आहे. 

टायगर श्रॉफने जेव्हा चित्रपट पाहायला सुरूवात केली होती तेव्हापासून अजय देवगन हा त्याचा आवडता अभिनेता होता. सिंघम अगेनमध्ये काम करणे हे टायगरला एखाद्या ब्लेसिंग सारखेचं वाटते. टायगर म्हणाला; पोलीस विश्वाचा भाग बनणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे. रोहित शेट्टीने ज्या प्रकारे माझी ओळख या चित्रपटात करुन दिली. मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी दिली त्या बद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. मला असे वाटते की अजय देवगन यांच्या कामाच्या नितीमत्तेचा मी फार मोठा चाहता आहे आणि त्यांची प्रशंसा करणे हे स्वाभाविक आहे.