लग्न करणं प्रायोरिटी नाही असं का म्हणाला हिना खानचा बॉयफ्रेंड

हिना खान तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

Updated: Aug 9, 2021, 05:50 PM IST
लग्न करणं प्रायोरिटी नाही असं का म्हणाला हिना खानचा बॉयफ्रेंड title=

मुंबई : छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यंत आपला सर्वोत्तम प्रवास करणाऱ्या हिना खानला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने आपल्या अभिनयाने आणि स्पष्ट बोलण्याच्या स्टाईलने करोडो चाहत्यांची मने जिंकली आहेत. अलीकडे, अभिनेत्रीने तिचे वडील गमावले, ज्यामुळे अभिनेत्री खूप अस्वस्थ झाली, परंतु या कठीण दिवसांमध्ये, तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल नेहमीच तिच्यासोबत होता.

हिना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे
अभिनयाव्यतिरिक्त हिना खान तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना अपडेट करते. हिना खान तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री दररोज रॉकीसोबत तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहते.

हे कपल बॉलिवूड कॉरिडॉरमध्ये खूप प्रसिद्ध आहे
हिना खान आणि रॉकी जैयस्वाल यांचे चाहते या दोघांना पती-पत्नी होण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. हे कपल त्यांच्या नात्यासाठी बॉलिवूडच्या कॉरिडोरमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हे दोघं लग्न कधी करणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता अलीकडेच रॉकी जैयस्वालने हिनाशी संबंधित लग्नाच्या प्रश्नांवर आपली उत्तरे दिली आहेत.

यामुळे रॉकीला लग्न करायचं नाही
नुकत्याच एका मुलाखतीत रॉकीला विचारण्यात आलं की, तो हिनाशी लग्न करणार आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना रॉकी म्हणाला की, तो गेल्या अनेक वर्षांपासून हिनासोबत आहे. लग्नाआधीच त्याने आयुष्यात लग्नानंतरच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. ज्यामुळे दोघेही एकमेकांसोबत आहेत.

रॉकीने पुढे म्हणाला की, विशिष्ट सामाजिक टॅग मिळवण्यासाठी त्याला असं काही करायचं नाही, कारण त्याचा अशा गोष्टींवर विश्वास नाही. तो म्हणाला की, त्याने असं अनेक लोक पाहिले आहेत जे लग्नानंतरही आनंदी नाहीत, ज्यामुळे लग्न करण्यात काहीच अर्थ नाही. तो म्हणाला की, आमचा एकमेकांवर विश्वास आहे, ते पुरेसं आहे.

रॉकी पुढे म्हणला की 'लग्न करण्यात काहीच नुकसान नाही, पण हीच वेळ आहे तुमच्या करिअरकडे लक्ष केंद्रीत करण्याची ज्यामुळे आमच्याकडे अद्याप लग्नाची कोणतीही योजना नाही. लग्नाला अजून बराच वेळ आहे. रॉकी आणि हिना खान यांचं नातं अनेक वर्षांचे आहे. 2009 मध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या सेटवर दोघांची भेट झाली.