टेलिव्हीजन अभिनेत्रीच्या डोक्यात पडला मेटल रॉड; रुग्णालयात दाखल

मालिकांच्या सेटवर होणारे अपघात पाहता, अनेकदा कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येतो. 

Updated: Aug 9, 2021, 05:43 PM IST
टेलिव्हीजन अभिनेत्रीच्या डोक्यात पडला मेटल रॉड; रुग्णालयात दाखल  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई :  ‘हमारी वाली गुड न्यूज’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान एक अपघात झाला असून, याममध्ये अभिनेत्री सृष्टी जैन (srishti jain) दुखापतग्रस्त झाली आहे. चित्रीकरणादरम्यान, सृष्टीच्या डोक्यात एक मेटल रॉड पडला, ज्यामुळं तिच्या डोक्याला मार लागला. सदर घटनेनंतर लगेचच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

क्र्यूमधील एक तंत्रज्ञ लाईट काढत असतानाच हा अपघात झाला असं सृष्टीनं सांगितल्याचं कळत आहे. सध्या सृष्टीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून, सूत्रांच्या माहितीनुसार ती घरीच राहून आराम करत आहे. 

भर स्टेडियममध्ये रणवीरसोबत अभिनेत्याचा 'दोस्ताना'

 

'माझ्या डोक्यात काहीतरी आदळलं...'
अपघाताबाबत सृष्टी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाली, 'मला जबर दुखापत झाली आहे. माझ्या डोक्यात काहीतरी आदळलं होतं. सीन शूट झाल्यानंतर मी त्या ठिकाणहून जात होते. कोणतीही लाईट किंवा जड वस्तूच्या मध्ये मी येणार नाही, याचाच मी प्रयत्न करत होते. पण, मला न सांगताच तिथे लाईट उतरवण्याचं काम सुरु करण्यात आलं. आणि तेव्हाच फेम हटवतेवेळी त्यांनी एक मेटल रॉड खोलला आणि तो थेट माझ्या डोक्यात येऊन पडला. मी उठले तेव्हा एका खुर्चीत होते. मला माझे सहकलाकार आणि काही लोकं रुग्णालयात घेऊन गेले कारण मला सिटीस्कॅन करुन घ्यायचा होता.'

रुग्णालयात सृष्टीला आपत्कालीन विभागात ठेवण्यात आलं होतं. तिच्यासाठी हा सारा अनुभव भीतीदायकच होता. सुदैवानं सर्व चाचण्यांमध्ये तिला गंभीर दुखापत नसल्याचं निष्पन्न झालं. या साऱ्यामध्ये टेक्निशियननं अधिक सतर्क राहत लाईट हटवत असल्याची पूर्वसूचना आपल्याला द्यायला हवी होती, असं मत तिनं मांडलं. ही घटना आणि मालिकांच्या सेटवर होणारे अपघात पाहता, अनेकदा कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येत आहे.