रितेश जेनेलियाच्या रोमान्समध्ये हा कोण आला 'कबाब मे हड्डी!', पाहा व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा हे बॉलिवूडचं एक सुंदर जोडपं मानलं जातं.

Updated: Jul 11, 2021, 05:01 PM IST
रितेश जेनेलियाच्या रोमान्समध्ये हा कोण आला 'कबाब मे हड्डी!', पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा हे बॉलिवूडचं एक सुंदर जोडपं मानलं जातं. हे दोघेही सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि एकमेकांचे रोमँटिक व्हिडिओही शेअर करतात. रितेशने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

बायकोला किस, पण ...
रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी जेनेलियाही रितेशसोबत दिसतआहे. व्हिडिओमध्ये असं दिसून आलं आहे की, अभिनेता आपल्या पत्नीला किस करण्याचा प्रयत्न करतो, मात्र कॅमेराचा एंगल बदलताच त्याचा पाळीव कुत्रा जेनेलियाची जागा घेतो. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धूमाकुळ घालत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रितेश आणि जेनेलिया यांनी 2012 मध्ये लग्न केलं. दोघंही आपले विवाहित जीवन आनंदाने जगत आहेत. या दोघांना रियान आणि राहिल अशी दोन मुलं आहेत,  रितेश देशमुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो लवकरच 'बच्चन पांडे' चित्रपटात दिसणार आहे. त्यांच्याशिवाय अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.