‘मला याची लाज ...’, वडील मुख्यमंत्री असताना सेक्स कॉमेडी चित्रपट करण्यावर रितेश देशमुखचं वक्तव्य चर्चेत

बॉलिवूड अभिनेता अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. 

Updated: Jul 22, 2022, 12:21 PM IST
‘मला याची लाज ...’, वडील मुख्यमंत्री असताना सेक्स कॉमेडी चित्रपट करण्यावर रितेश देशमुखचं वक्तव्य चर्चेत title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेशचं नाव कोणासाठी नवीन नाही. प्रत्येक चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत रितेश दिसतो. मराठी कुटुंबातील रितेशनं बॉलिवूड चित्रपटसृष्टीत स्वत: ची जागा बनवली आणि ते देखील त्याच्या अभिनयाच्या जोरावर. रितेशचे वडील विलासराव देशमुख आणि भाऊ अमित देशमुख हे राज्याच्या राजकारणात सक्रिय असताना, इतकंच काय तर वडील फक्त राजकारणात सक्रिय नाही तर मुख्यमंत्री असताना रितेशनं काही बोल्ड चित्रपटांमध्ये काम केलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रितश या विषयी स्पष्टपणे बोलला आहे. 
 
रितेशनं नुकतीच 'ईटाइम्स'ला मुलाखत दिली. यावेळी या मुलाखतीत रितेशला मस्ती, टोटल धमाल, मस्तीजादे, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या सेक्स कॉमेडी चित्रपटातील बोल्ड सीन आणि अशा भूमिकांविषयी विचारण्यात आलं. यावर रितेश मोकळेपणाने बोलला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रितेश म्हणाला, “मी नेहमीच माझ्या भूमिकांचा विचार करतो. वडील राजकारणात असतानाच मी अभिनयक्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला होता. सुदैवानं मला वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी मिळाली. सेक्स कॉमेडी हा चित्रपटाचा एक प्रकार आहे. माझ्यात असलेल्या कलाकारासाठी ती एक भूमिका आहे. पडद्यावर मी सेक्सपूरक भूमिका करणं किंवा इंटिमेट सीन देणं हे अभिनेता म्हणून माझं काम आहे आणि मी ते केलं.” 

रितेश पुढे म्हणाला, “मला याची मुळीच लाज वाटत नाही किंवा निर्णय चुकल्याची खंत वाटत नाही. घरी वडील, भाऊ यांचा माझ्या अभिनयाला पाठिंबाच होता. ते चित्रपट करणं माझी निवड होती. माझे आई-वडील याबाबत मला काही सांगत नाहीत. माझ्या चित्रपटात त्यांचा हस्तक्षेप नव्हता. माझी मुलं जेव्हा माझे सेक्स कॉमेडी चित्रपट पाहतील तेव्हा त्यांच्या प्रतिक्रियांची भीती वाटत नाही का? असंही मला विचारलं जातं. पण अजून तरी माझी मुलं यापासून लांब आहेत. पण त्यांना चित्रपट आणि खरं आयुष्य यातील फरक नक्कीच समजेल.

रितेशनं 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याची सहकलाकार ही त्याची पत्नी जिनिलिया होती. दरम्यान रितेश सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसतो. सोशल मीडियावर जिनिलियासोबतचे अनेक फोटो तो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. लवकरच रितेश ‘एक व्हिलन रिटर्न’ या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, रितेश ‘वेड’ या मराठी चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.