साराच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर ऋषी कपूर असं काही म्हणाले की...

विमानतळावर सेलेब्रिटींनी कसे वागावे हे साराच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. 

Updated: Aug 8, 2019, 02:26 PM IST
साराच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर ऋषी कपूर असं काही म्हणाले की... title=

मुंबई : सध्या सारा आली खान तिच्या साधेपणा साठी चांगलीच चर्चेत आहे. ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. कायम प्रकाशझोतात असलेल्या साराचे पाय कायम जमीनीवर असतात. तिला तिच्या प्रसिद्धीवर कोणत्याही प्रकराचा गर्व नाही. ती सर्वांसोबत आगदी विनम्रतने राहते. त्यामुळे अभिनेता ऋषी कपूर यांनी साराचे कौतुक केले आहे. स्वत:चे काम स्वत: करण्याचा उत्तम दाखल साराने काही दिवसांपूर्वी दिला होता. विमानतळावर सेलेब्रिटींनी कसे वागावे हे साराच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. 

सारचे कौतुक करत ऋषी कपूर यांनी एक ट्विट पोस्ट केले आहे. 'खूप छान सारा, तू एक उदाहरण कायम केले आहे. विमानतळावर कसे वागले पाहिजे. आपलं सामान स्वत: घेवून जाण्यात काही कमी नाही. सामान सांभाळण्यासाठी कोणी दुसरा व्यक्ती नाही त्याचप्रमाणे सुरक्षारक्षकही नाहीत, एअरपोर्ट लूक नाही.' 

अशा भावपूर्ण शब्दांमध्ये त्यांनी साराचे कौतुक केले आहे. सेलेब्रिटी किड्सपैकी एक असलेली सारा मनात कोणताही संकोच न बाळगता स्वत:च काम स्वत: करण्याचा संदेश देत आहे, असं बोलणं वावगं ठरणार नाही. चाहत्यांकडून त्याचप्रमाणे कलाकारांकडून सुद्धा  साराच्या व्हायरल व्हिडिओला पसंती मिळत आहे.

दिल्लीमध्ये पहिल्यांदाच साराने फॉशन शोमध्ये रॅम्प वॉक केले. यावेळेस साराचा उत्साह वाढवण्यासाठी चक्क कार्तिक याठिकाणी उपस्थित होता. कार्तिक आणि सारा त्यांच्या आगामी 'लव आज कल २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाशिवाय सारा 'कुली नंबर १' चित्रपटातून वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर करणार आहे

तर, ऋषी कपूर सध्या त्यांच्या उपचारासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. ते लवकरच आपल्या मायदेशी परतणार आहेत. न्यूयॉर्कमध्ये ते कर्करोगावर उपचार घेत आहेत. त्यांना भेटण्यासाठी अनेक कलाकार न्यूयॉर्कला जातात.