'संजू'च्या यशानंतर रणबीरसाठी ऋषी कपूरची इमोशनल पोस्ट

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'संजू' सिनेमाचं यश सेलिब्रेट करत आहे. 

Updated: Jul 2, 2018, 07:26 PM IST
'संजू'च्या यशानंतर रणबीरसाठी ऋषी कपूरची इमोशनल पोस्ट  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'संजू' सिनेमाचं यश सेलिब्रेट करत आहे. तीन दिवसांपूर्वी 'संजू' हा सिनेमा रिलीज झाला आहे. मात्र बॉक्सऑफिवर दमदार ओपनिंग मिळवलेल्या या सिनेमाने 100 कोटींच्या पार गल्ला जमावला आहे. 

ऋषी कपूर यांचे ट्विट  

रणबीर कपूराने बॉक्सऑफिवर अनेक सिनेमांचे विक्रम मोडीत काढले आहेत. सध्या ऋषी कपूरही रणबीरच्या या यशामुळे आनंदीत झाले आहेत. ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून रणबीरच्या यशाबद्दल आपल्या भावना मोकळ्या केल्या आहेत. 

 

ट्विटरवर अनेक कारणांमुळे चर्चित असलेले ऋषी कपूर सध्या मात्र त्यांच्या इमोशनल पोस्टमुळे ट्रेंड होत आहेत. रणबीरच्या 'संजू'चं कौतुक करताना पालक म्हणून अत्यंत गर्व होत आहे. देवाचा तुझ्यावर असाच आशिर्वाद राहू दे. भविष्यात अजून चांगले काम कर अशा शुभेच्छा त्यांनी रणबीरला दिल्या आहेत. 'संजू'चा 'बाहुबली'ला मागे टाकत विक्रम

बॉक्सऑफिसवर दमदार कलेक्शन 

'संजू' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर अवघ्या तीन दिवसात 120 कोटींचा गल्ला कमावला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर असलेल्या या चित्रपटामध्ये परेश रावल यांनी सुनील दत्तची भूमिका साकारली आहे. तर  मनीषा कोईराला नर्गिसच्या, सोनम कपूर 'टीना मुनीम', दिया मिर्जा 'मान्यता दत्त', अनुष्का शर्मा वकीलाच्या भूमिकेत आहे.