Bollywood News: करिअर हा सर्वच मुलींसाठी महत्त्वाचा टप्पा आहे. करिअस जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत मुली लग्नाचा निर्णय घेत नाहीत. सामान्य मुलींदेखील आता करिअरबाबत सजग झाल्या आहेत. तर, बॉलिवूड अभिनेत्री तर बघायलाच नको. यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री तर इतक्यात लग्नाचं नावही काढत नाही. तर, मुलांचा विचारही करत नाहीत. मात्र, 90 च्या दशकातील एका अभिनेत्रीने वयाच्या 17 व्या वर्षीच एका मुलीची आई झाली. व आपल्या वयाच्या 15 वर्ष मोठ्या अभिनेत्याशी लग्नगाठ बांधली. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया.
करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना ही सुपरस्टार अभिनेत्री 15 व्या वर्षीय प्रेमात पडली. त्यानंतर लगेचच तिने लग्न केले. अल्पवयीन असतानाच या अभिनेत्रीने लग्न केले. 15 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत तिने लग्न केले. मात्र, लग्नानंतर मुलांच्या संगोपनासाठी तिने इंडस्ट्री सोडली. मात्र, तिचा संसार काही फार काळ टिकला नाही. 9 वर्षांच्या संसारानंतर ती पतीपासून वेगळी झाली. डिंपल कपाडिया हीची ही सर्व गोष्ट आहे.
डिंपल कपाडिया हिने 90 च्या दशकात बॉलिवूड गाजवलं होतं. लहानपणापासून हिरोइन बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. ते स्वप्न पूर्णदेखील झाले मात्र, ते काही फार काळ टिकले नाही. डिंपल कपाडिया 14 वर्षांची असताना निर्माता राज कपूर यांनी तिला चित्रपटात काम दिले. राज कपूर यांनीच डिंपल यांना बॉलिवूडमध्ये आणले. 1973 साली आलेला बॉबी हा तिचा पहिला चित्रपट. अभिनेता ऋषी कपूर यांच्यासोबत ती या चित्रपटात झळकली.
डिंपल कपाडियाचा पहिला चित्रपटच खूप हिट ठरला. त्यानंतर तिची लोकप्रियताही वाढली. 1973मध्ये चित्रपट रिलीज होण्याच्या काही काळ आधीच ती तिच्यापेक्षा वयाने 15 वर्ष मोठ्या असलेल्या राजेश खन्ना यांच्या प्रेमात पडली. तेव्हा तिचे वय अवघे 16 वर्षे होते. लग्नानंतर तिने अभिनयाला राम राम ठोकला होता.
डिंपल कपाडिया यांनी जेव्हा लग्न केले होते. तेव्हा त्यांचे वय फक्त 16 वर्षे इतके होते. त्यानंतर एक वर्षातच म्हणजे 17व्या वर्षी त्या प्रेग्नेंट झाल्या. त्यानंतर ट्विंकल खन्ना हिचा जन्म झाला. ट्विंकल खन्ना यांच्यानंतर त्यांनी रिंकी खन्ना हिचा जन्म झाला. मुलींच्या संगोपनाचे कारण देत त्यांनी अभिनय सोडला. लग्नानंतर डिंपल खूप खुश होत्या. पतीसोबत वेळ व्यतित करण्यासाठी त्यांनी अभिनयदेखील सोडला. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. 9 वर्षांनंतर ते वेगळे झाले.
डिंपलने 1982 मध्ये राजेश खन्ना यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी घटस्फोट घेतला नाही. दोघही वेगळे राहू लागले. राजेश खन्ना यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर डिंपल यांनी 1984 साली पुन्हा सिनेविश्वात पदार्पण केले. त्यांनी सागर या चित्रपटातून कमबॅक केले. डिंपल कपाडिया यांचा बॉबी आणि सागर या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.