ऑनस्क्रीन सासूबाईंसोबत रिंकूचा क्यूट फोटो; म्हणाली, 'माझं लग्न झालेलं नाही पण सासू पाहिजेल तर अशी'

Nirmiti Sawant and Rinku Rajguru: 'झिम्मा 2' हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. यावेळी या चित्रपटातील रिंकू राजगुरू आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांची जोडीही चित्रपटातून प्रचंड गाजते आहे. नुकताच रिंकूनं एक क्यूट फोटो शेअर केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Dec 9, 2023, 07:06 PM IST
ऑनस्क्रीन सासूबाईंसोबत रिंकूचा क्यूट फोटो; म्हणाली, 'माझं लग्न झालेलं नाही पण सासू पाहिजेल तर अशी' title=
rinku rajguru shares and cute photo with nirmiti sawant jhimma 2 latest entertainment news in marathi

Nirmiti Sawant and Rinku Rajguru: 'झिम्मा 2' हा चित्रपट सध्या जोरात सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या हा चित्रपट जोरात कमाई करताना दिसतो आहे. चित्रपटात रिंकू राजगुरू आणि निर्मिती सावंत यांच्या सासू सून जोडीचीही बरीच चर्चा आहे. त्यांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. यावेळी रिंकूच्या एका पोस्टनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या ऑनस्क्रीन सासूबाईंसोबत रिंकूनं काही क्यूट फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''माझं लग्न झालेल नाही पण,सासू पाहिजेल तर अशी. UNO UNO UNO!!!'' यावेळी तिच्या या पोस्टखाली अनेक कमेंट्स आल्या आहेत. तानिया हे पात्र 'झिम्मा 2' मध्ये तिनं निभावलं आहे.

यावेळी नेटकऱ्यांनीही कमेंट्स केल्या आहेत. एकानं लिहिलंय, 'बेस्ट जोडी... बेस्ट केमेस्ट्री' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय, 'फोटोत प्रत्येक सासू अशीच दिसेल. जस्ट किडिंग'. एकानं लिहिलंय, 'नवस केला तरी तो फेडावा लागतो(आत्त्या बाई) - नवरा माझा नवसाचा ह्या सिनेमाची आठवण झाली.' अशाच एका युझरनं लिहिलंय, 'चित्रपटातील तुमची केमिस्ट्री बघुन.... इतकी मज्जा आली इतकी मज्जा आली...रिंकू तुला नक्की मिळेल अशी सासू....' तर एकानं लिहिलंय की, 'यू बोथ आर जस्ट लुकिंग लाईक अ वॉव'. एका युझरनं कमेंट केलीय की, 'गंगुबाई विथ आर्ची'. 

निर्मिती सावंत आणि तिच्या चित्रपटात 'तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना' असं काहीसं नातं दाखविण्यात आलं आहे. परंतु त्यांच्या रूसवेफुगवे असले तरीसुद्धा त्यांच्यातील हळव्या नात्यामुळे त्यांचं नातं हे आणखीनंच बहरत जातं. त्यांच्या नात्यातील गंमत आपल्याला कळत जाते. या चित्रपटातील प्रत्येक पात्रं हे खूप खास आणि वेगळं आहे. निर्मिती सावंत यांच्या पात्राचेही विशेष कौतुक होताना दिसते आहे. रिंकूच्या नव्या चित्रपटातील एन्ट्रीनंही सिनेमाला फ्रेशनेस दिला आहे. 

हेही वाचा : 'इतकी वर्ष मनात किंतु होता पण...', वडिलांच्या आठवणीने फुलवा खामकर भावूक, पोस्टनं वेधलं लक्ष

 

2021 मध्ये 'झिम्मा'चा पहिला भाग हा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर यावर्षी 24 नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या झिम्माच्या दुसऱ्या भागाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.