Richa Chaddha and Ali Fazal Combined Net Worth: बॉलीवूडमध्ये सगळ्यांनाच कलाकारांची नेटवर्थ किती यामध्ये कायमच इंटररेस्ट राहिला आहे. त्यातून नवविवाहित कपल रिचा आणि अलीच्या लग्नाचीही एकच चर्चा आहे. बॉलीवूड अभिनेता अली फजल आणि ऋचा चढ्ढा यांचा 4 ऑक्टोबर 2022 रोजी विवाहसोहळा संपन्न झाला. तेव्हापासून रिचा आणि अली सतत चर्चेत आहे. या जोडप्याचे चाहते अनेक वर्षांपासून त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते आणि या प्रेमीयुगूलांनी लग्नगाठ बांधली.
सध्या रिचा चड्ढा आणि अली फजल काय करतायत? तसेच त्यांची संपत्ती किती असे अनेक कुतूहलाचे प्रश्नही त्यांच्या चाहत्यांना पडतायत. 2012 मध्ये अली आणि रिचा 'फुक्रे' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रिचा आणि अलीची प्रेमकहाणी सुरू झाली आहे.
पण तुम्हाला माहितीये का रिचा आणि अलीची एकत्रित संपत्ती किती आहे? फुक्रे चित्रपटानंतर ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले आणि लवकरच त्यांनी सोशल मीडियावर त्यांचे नाते जाहीर केले. इतकी वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रिचा चढ्ढा आणि अली फजल शेवटी विवाहबंध झाले.
रिपोर्ट्सनुसार, अली फजल आणि रिचा चढ्ढा दोघेही 2020 पर्यंत आपापल्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. अली किंवा रिचा या दोघांनीही मुंबईत मालमत्ता खरेदीसाठी पैसे गुंतवले नव्हते. एप्रिल 2020 मध्ये अली आणि रिचा एकत्र शिफ्ट झाले. कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान घराचा बराच काळ शोध घेतल्यानंतर त्यांनी एक भाड्याचे अपार्टमेंट घेतले आहे. माहितीनुसार, रिचा आणि अली येथे राहण्यासाठी लाखों रूपये देत आहेत.
रिचा प्रत्येक चित्रपटासाठी 20-25 लाख रुपये घेते तर अली एका चित्रपटासाठी 25-30 लाख रुपये घेतात. रिचा चढ्ढा आणि अली फजल यांची एकूण संपत्ती 54 कोटी आहे. यापैकी अलीची एकूण संपत्ती 23 कोटी आहे तर रिचाची एकूण संपत्ती 31 कोटी आहे.
रिचा आणि अली कडे आहे करोडो रूपयांचे कार कलेक्शन -
अली फजल आणि ऋचा चढ्ढा यांना आलिशान कारची खूप आवड आहे. 2017 मध्ये त्यांनी आलिशान मर्सिडीज-बेंझ GLE घेतली. या कारची किंमत 1.1 कोटी रुपये आहे. याशिवाय रिचाकडे ऑडी A4 देखील आहे, जी तिने 80 लाख रुपयांना खरेदी केली होती. अली फजलकडे BMW X6 आहे आणि त्याची किंमत 68 लाख रुपये आहे. तसेच त्याच्या असलेल्या टोयोटा लँड क्रूझरची किंमत सुमारे 1.18 कोटी रुपये आहे.