'हम आपके हैं कौन'मधील 'तो' प्रसंग पाहून रेणुका शहाणे यांचा मुलगा संतापला? कारण आलं समोर

Renuka Sahane Son Angry on Hum Apke Hai Kon Scene: 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट आपल्या सर्वांच्याच आवडीचा आहे. त्यामुळे या चित्रपटाची आजही काही क्रेझ कमी झालेली नाही. रेणुका शहाणे यांनी नुकताच या चित्रपटाबद्दल एक किस्सा सांगितला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 6, 2023, 04:53 PM IST
'हम आपके हैं कौन'मधील 'तो' प्रसंग पाहून रेणुका शहाणे यांचा मुलगा संतापला? कारण आलं समोर title=
renuka shahane explains that after watching hum aapke hain koun her son was upset and angry

Renuka Sahane on Hum Aapke Hain Koun: 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट आपण अनेकदा तरी पाहिला असेलच. त्यातून इतक्या वर्षांनंतरही हा चित्रपट कुटुंबातील आणि सर्वच वयातील मंडळी पाहताना दिसतात. 1994 साली 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता. त्यामुळे या चित्रपटाची तेव्हा चांगलीच क्रेझ निर्माण झालेली होती. जी इतक्या वर्षांनंतरही आहे. सोबतच हा चित्रपट हा पुर्णपणे फॅमिली एन्टरटेनर आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्र आपल्या आजही लक्षात आहे. हा चित्रपट रोमॅण्टिक, कॉमेडी आणि इमोशनलही आहे. आपल्यालाही मैत्री दाखवतो, प्रेम दाखवतो, माया दाखवतो आणि सोबतच डोळ्यात पाणीही आणतो. त्यामुळे हरतऱ्हेचे शेड्स असलेला हा चित्रपट आपल्यालाही पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. रेणुका शहाणे यांचा शेवटचा मृत्यूचा प्रसंग आपल्या अंगावर काटाच आणतो. त्यानंतर या चित्रपटाचे पुर्ण चित्रच पालटले होते आणि चित्रपटात त्यांच्या मृत्यूमुळे माधुरी दीक्षित-सलमान खानचे संपुर्ण आयुष्यच बदलून जाते. 

परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रेणुका शहाणे यांनी या चित्रपटाशी निगडीत एक प्रसंग सांगितला आहे. जो ऐकून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. आपली आई ही कितीही मोठी अभिनेत्री किंवा सेलिब्रेटी असली तरीसुद्धा शेवटी ती आईच असते. त्यामुळे रूपेरी पडद्यावर तिच्या मरणाचाही सीन असला तरीसुद्धा मुलांना मात्र त्याचा त्रास होतोच. असाच काहीसा प्रसंग हा रेणुका शहाणे आणि त्यांच्या मुलासोबतही घडला होता. रेणुका शहाणे या खूपच संवेदनशील आणि चोखंदळ अभिनेत्री आहेत. त्यांचे अनेक सिनेमे, मालिका, नाटकं या गाजलेल्या आहेत. सुरभि ही त्यांची मालिका ही प्रचंड गाजली होती. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत अफाट वाढ झाली होती. तेव्हा अक्षरक्ष: त्यांना ढीगभरून प्रेक्षकांची पत्रेही येयाची. 

हेही वाचा - ये दिल मांगे 'मोर'! पठ्ठ्यानं चमचांपासून साकारली अत्यंत सुंदर कलाकृती...; पाहा भन्नाट Video

'बॉलिवूड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, ''मी माझ्या मुलांना, ते दोघेही साधारण 10-12 वर्षांचे असताना 'हम आपके है कौन' चित्रपट दाखवला होता. त्यांच्यासाठी रेणुका शहाणे ही त्यांची आई होती. त्यामुळे तो चित्रपट त्यांनी याआधी कधीच पाहिला नव्हता. मी अभिनेत्री आहे याचीही त्यांना कल्पना नव्हती.', असं त्या म्हणाल्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे रेणुका शहाणे म्हणाल्या की, ''जेव्हा माझी मुलं साधारण 10-12 वर्षांची झाली, तेव्हा त्यांना शाळेतील मित्रमंडळी, इतर काही पालकांमुळं मी 'हम आपके है कौन' चित्रपटात काम केले आहे हे कळाले. एके दिवशी दोघेही घरी आले आणि त्यांनी मला आम्हाला पूर्ण चित्रपट पाहायचा आहे असं सांगितलं. चित्रपटातील माझ्या मृत्यूचा प्रसंग पाहून माझा मोठा मुलगा फार अस्वस्थ झाला. त्याला दिग्दर्शक सूरजजींचा खूप राग आला होता. तो संतापून म्हणाला, मी त्यांना कधी पाहिले तर…' एकंदर त्या चित्रपटातील त्या सीनमुळे त्याच्यावर वाईट परिणाम झाला होता.', अशी आठवण त्यांनी सांगितली.