मुंबई लोकलमध्ये भिक मागणारी 'ही' ट्रान्सजेंडर व्यक्ती दिसणार 'बिग बॉस १५' मध्ये?

'बिग बॉस' या रिएलिटी शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Updated: Jun 25, 2021, 07:03 PM IST
मुंबई लोकलमध्ये भिक मागणारी 'ही' ट्रान्सजेंडर व्यक्ती दिसणार 'बिग बॉस १५' मध्ये?  title=

मुंबई : 'बिग बॉस' या रिएलिटी शोचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानच्या या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी आधीच अनेक नावं चर्चेत आहेत. तसंच या रिएलिटी शोसाठी अनेकांना संपर्कही साधण्यात आला आहे. याआधी अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती या दोघी एकत्र या रिएलिटी शोमध्ये दिसणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अशीच एक चर्चा पुन्हा एकदा रंगताना दिसत आहे. मात्र ही चर्चा नेमकी कुणामुळे रंगतेय आहे जाणून घ्या

मुंबईच्या लोकलमध्ये आपलं वेगळं स्थान मिळवलेली ट्रान्सजेंडर पुजा शर्मा ट्रान्सजेंडर समुदायाची सदस्य आणि सोशल मीडिया स्टार आहे. बिग बॉस -15 मध्ये पूजा शर्माचं नाव समोर आलं आहे. पूजाची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे आणि लोकांमध्ये तिची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी तिला शोमध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूजा शर्माला बिग बॉस 15 साठी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र, अद्याप हे निश्चित झालं नाहीये. मात्र सामान्य म्हणून तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरुये.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pooja Sharma (@pooja_sharma_rekha)

कोण आहे पूजा शर्मा 
पूजा शर्माविषयी बोलताना, तिला बलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांच्या नावानं ओळखलं जातं. कारण पूजा शर्माची ड्रेसिंग सेन्स, साड्यांवरील प्रेम आणि तिचे सौंदर्य रेखा यांना प्रेरणा देतं. पूजा शर्मा रेखा यांची कॉपी करते आणि त्यांच्यासारखं राहण्याचा प्रयत्न करते. पुजा स्वत: रेखा यांची खूप मोठी चाहती आहे. पूजा पश्चिम लाईनच्या ट्रेनमध्ये नटून-थटून  फिरत असते आणि नेहमीच चर्चेचा विषय बनते. लोक तिला मुंबईच्या लोकल ट्रेनमधील 'रेखा' या नावाने ओळखतात.

पूजा शर्मा बऱ्याचवेळा मुंबई लोकल ट्रेन 7:40 लेडीज स्पेशलमध्ये प्रवास करते. नंतर तिने टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर आपल्या डान्सचे व्हिडिओ शेअर केले. तिच्या सुंदर डान्सने आणि लुकने अनेकांची तिने मने जिंकली आहेत. इंस्टाग्रामवर पूजा शर्माचे 200k पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पुजा लैंगिक रूढी तोडण्यासाठी आणि तिच्या समुदायाबद्दल जागरूकता पसरविण्यासाठी प्रसिध्द आहे.

तसंच तिला मिळणारी प्रसिद्धी पहाता अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिला तिच्या घराच्या एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं. यानंतर पूजा शर्मा चर्चेत आली होती. अंकिताने पूजा आणि तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर केले आहेत. आता पुजा खरंच बिग बॉसमध्ये दिसणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.