अमिताभ यांना पुरस्कार मिळताच रेखांचा आनंद गगनात मावेना; जया बच्चनकडे आल्या अन्...

Jaya Bachchan Rekha Video: जया बच्चन आणि रेखा या दोघींमध्ये विस्तवही जात नाही. मात्र, एका पुरस्कार सोहळ्यात दोघींना एकमेकींना कडकडून मिठी मारली होती. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 26, 2024, 11:13 AM IST
 अमिताभ यांना पुरस्कार मिळताच रेखांचा आनंद गगनात मावेना; जया बच्चनकडे आल्या अन्... title=
rekha hugged jaya bachchan when amitabh bachchan got the award video goes viral

 Jaya Bachchan Rekha Video: एकेकाळी हिंदी सिनेसृष्टी गाजवलेल्या दोन अभिनेत्री म्हणजे रेखा आणि जया बच्चन. या दोघींचेही असंख्य चाहते चित्रपटातही त्यांनी एकत्र काम केले होते. मात्र, अलीकडच्या काळात या दोन्ही अभिनेत्रींना एकत्र पाहणे जरा दुर्लभचं झालं आहे. मात्र, ही अशक्य गोष्ट 2015 च्या एका पुरस्कार सोहळ्यात शक्य झाली होती. जेव्हा अमिताभ बच्चन यांनी चित्रपट पीकूसाठी सर्वोत्त्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर जया बच्चन आणि रेखा यांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली होती. सध्या अमिताभ बच्चन, जया आणि रेखा यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

अमिताभ बच्चन यांना पिकू या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या नावाची घोषणा होताच जया आणि अमिताभ बच्चन दोघंही त्यांच्या जागेवरुन उभे राहिले. त्यानंतर अमिताभ पुरस्कार घेण्यासाठी मंचावर गेले. तर, रेखा काही अंतरावरच उभ्या होत्या. अमिताभ पुढे जाताच रेखा जया यांच्याकडे गेल्या आणि त्यांना कडकडून मिठी मारली. त्यानंतर दोघींनीही अमिताभ यांना पुरस्कार स्वीकारतानाचा क्षण एकत्रच पाहिला. 

दिग्दर्शक सुभाष घई यांनी बेस्ट अॅक्टर म्हणून रणवीर सिंह आणि अमिताभ बच्चन यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर अमिताभ यांना पुरस्कार  जाहिर करण्यात आला. अमिताभ यांचं नाव एकताच रेखा यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्या लगेचच उभ्या राहिल्या आणि टाळ्या वाजवून अमिताभ यांचं कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी जया यांचीही भेट घेतली. जया यांना मिठी मारुन त्यांनी त्यांच्याशी संवाददेखील साधला.

रेखा आणि अमिताभ बच्चन यांचा चित्रपट

रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी मुकद्दर का सिकंदर, मिस्टर नटवरलाल, गंगा की सौंगध या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर, रेखा, जया आणि अमिताभ बच्चन हे तिघेही यश चोप्रा यांच्या सिलसिला चित्रपटात एकत्र दिसले होते. रेखा आणि अमिताभ यांचा हा शेवटचाच चित्रपट होता. हा चित्रपट जरी फ्लॉप झाला असला तरी तेव्हा अमिताभ आणि रेखा यांच्या नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं होतं. 

रेखा यांनी दिली होती कबुली 

2004 मध्ये सिमी गरेवाल यांना दिलेल्या मुलाखतीत जेव्हा रेखा यांना विचारण्यात आलं की कधी त्या अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात पडल्या होत्या का? तेव्हा त्यांनी लगेचच हो असं उत्तर दिलं. तसंच, हा खूप मुर्खपणाचा प्रश्न आहे. मी का हे नाकारु माझं त्यांच्यावर प्रेम आहे. मी त्या व्यक्तीसाठी तसं फिल करते, असं रेखा यांनी म्हटलं होतं.