Aadesh Bandekar in Dance Maharashtra Dance : आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) हे नाव कोणाला माहित नाही, असे होणार नाही. 'आदेश भावोजी' याच नावाने ते जास्त लोकप्रिय आहेत. 'होम मिनिस्टर' (Home Minister) हा महिला वर्गात तुफान लोकप्रिय असलेल्या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर घराघरात पोहोचले आहेत. गेल्या 18 वर्षांपासून ते 'होम मिनिस्टर' कार्यक्रम करत आहेत. मात्र, आदेश हे लहानपणी कसे होते, याबाबत वडील चंद्रकांत बांदेकर यांनी गुपित उघड केले आहे. 'झी मराठी'च्या (ZEE MARATHI) 'डान्स महाराष्ट्र डान्स' (Dance Maharashtra Dance Little Masters) या कार्यक्रमात.
Dance Maharashtra Dance : ‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’ (Dance Maharashtra Dance Little Masters) हा कार्यक्रम 'झी मराठी'वर आठवड्यातून दोन दिवस प्रेक्षकांच्या भेटीस येतो. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक दिग्गज कलाकार या कार्यक्रमाच्या स्टेजवर आले होते. यावेळी त्यांचे वडील चंद्रकांत बांदेकरही आले होते. त्यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी आदेश यांच्याबाबत अनेक गुपित उघड केलीत. त्याचवेळी आपल्यावर ओढवलेला प्रसंग आदेश बांदेकर यांनी सांगितला. लहानपणी आदेश कसा होता याचे अनेक अनुभव, अनेक किस्से त्यांनी सांगितले. आदेश यांना आपल्या बालपणीच्या प्रवासादरम्यानचा एक असाच किस्सा शेअर केला. मात्र, आदेश बांदेकर यांचे दहावीचे गुणपत्रक स्क्रीनवर दाखविण्यात आल्यानंतर त्यांनी डोक्याला हात लावला. बाबा तुम्ही काय करताय, असे म्हणत उठून बाबांजवळ जात त्यावेळची आठवण शेअर केली.
स्क्रीनवर आदेश यांची शालेय गुणपत्रक दाखवताच, माझं हृदय धडधडायला लागले आहे, असे उद्गार त्यांच्या तोडून यावेळी निघाले. पप्पा काय करताय हे! शिवाजी विद्यालय काळाचौकी. सहावीत पहिला क्रमांक पटकवणाऱ्या आदेशचे नंतर चांगलेच भांडे फोडले. त्यावेळी आदेश म्हणाले, बाबा काय केलं हे..? दहावीचे मार्कशिट दाखवले. त्यांना सुमारे 37 टक्के गुण पडलेत. त्यानंतर वडिलांनी काय जादू केली. भारत माताजवळ श्रीकृष्ण दुग्धालय होते. तेथून पेढे आणले. हा किस्सा आदेश यांनीच सांगितला.
मला दहावीत साधारण 37 टक्के मार्क पडले. माझे गुणपत्रक बाबांनी पाहिले. ते मला काहीही बोलले नाहीत. त्यांनी पेढे आणले आणि मला जवळ बोलावले आणि म्हणाले आदेश, हे पेढे घे ! प्रत्येक पिशवीत पाच पेढे भर आणि वसाहतील सगळ्या घरात जाऊन हे पेढे वाट आणि किती गुण पडले तेही सांग. त्यानंतर बिल्डींग क्रमांक -5. एकूण 90 घरे होती. मला 37 टक्के पडले हेही सांगायचे होते. मला चांगलाच धडा मिळाला, असे ते म्हाले. अशा काही गोष्टी असतात.आज ते पेढे उपयोगात आले आहेत, असे त्यांचे वडील चंद्रकांत बांदेकर यांनी सागितले आणि आदेश यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
त्याचवेळी DMD या कार्यक्रमात नारळ, वडाची फांदी ठेवली होती आणि एक गाणेही ऐकविण्यात आले. यावेळी आदेश यांनी नारळाबाबत किस्सा सांगितला. मी नारळाचा व्यवसाय केला. पण तो एकच दिवस केला. पुन्हा नारळ हातात घेतला नाही. वडाच्या फांदीवरुन आपण कसा वडिलांचा मार खाल्ला तेही सांगितले. त्याचा किस्साही त्यांनी सांगितला, माझी आई नर्स होती. तिला कामावर जाण्यास उशिर होऊ नये म्हणून मी आदल्या दिवशी वडाच्या फांद्या घरी आणल्या होत्या. या फांद्या मी ड्रममध्ये पाण्यात ठेवून दिल्या होत्या. तसेच मी या फांद्या स्वत: झाडावर चढून काढल्या होत्या, हे शेजाऱ्यांनी माझ्या वडिलांना सांगितले. त्याने आमच्या घरातही दिल्या, अशीही माहिती त्यांना मिळाली. माझे वडील चंद्रकांत बांदेकर हे कामावरुन आले. मला बोलावले आणि विचारले, तू वडाच्या फांद्या तोडून आणल्या का? त्यावेळी हो असे मी सांगितले. त्यानंतर त्यांनी ड्रममधील त्या फांद्या घेऊन मला चांगलेच बदडून काढले. तेव्हापासून मी काही झाडावर आजतागायत चढलेलो नाही.
याबाबत त्यांचा बाबांनी सांगितले की, त्यामागे त्यांची काळजी होती. आदेश हा लहानपणी भयंकर खोडकर होता. आज तो यशस्वी आहे, त्यामागेही कठोर प्रयत्नाबरोबर धाक होता म्हणून, हेही त्यांनी आवर्जुन सांगितले.