....म्हणून सनीच्या नवऱ्याने पॉर्न इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली!

सनी लिओनीने ६ वर्षांपूर्वी जिस्म 2 या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.

Updated: Aug 23, 2018, 01:04 PM IST
....म्हणून सनीच्या नवऱ्याने पॉर्न इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली! title=

मुंबई : सनी लिओनीने ६ वर्षांपूर्वी जिस्म 2 या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. यामुळे समी लिओनीला बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळख तर मिळालीच पण त्याचबरोबर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या. तरीही देखील तिचा भूतकाळ काही तिच्यापासून पुसला गेला नाही. त्यामुळे तिच्यावर अनेक टीका झाल्या आणि अनेक वादांचा सामना तिला करावा लागला. पण सनी लिओनीने पती डेनियलचा पॉर्न इंडस्ट्रीमधील प्रवास कसा सुरु झाला, याबद्दल खुलासा केला आहे. 

यातून उलघडले सनीचे आयुष्य

सनी लिओनीचे आयुष्य हे खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. तिने अनेकदा पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येण्यामागचे कारण उलघडून सांगितले आहे. त्याचबरोबर अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी' या वेब सिरीजमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक रहस्यांचा उलघडा झाला आहे. 

म्हणून डेनियलने पॉर्न इंडस्ट्रीत काम करण्यास सुरु केले

यादरम्यान सनीने पती डेनियलबद्दल अशी एक गोष्ट सांगितली की, ''त्यावरून तिच्या आणि पतीमधील बॉन्डिंगचा प्रत्यय येतो. सनीने सांगितले की, डेनियलने माझ्यामुळे पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. कारण दुसरं कोणासोबत मला बघणं, त्याला शक्य नव्हतं. तो कंफर्टेबल नव्हता.''

पुढे ती म्हणाली की, ''डेनियलने माझे प्रत्येक स्वप्न त्याचे मानून पूर्ण केले आहे. त्यानेच मला विश्वास दिला की, असे काहीही नाही जे पूर्ण होऊ शकत नाही.'' 

बायोपिकचा प्रवास अवघड

गेल्या काही दिवसांपासून बायोपिकमुळे सनी लिओनी खूप चर्चेत राहिली. तुझेच आयुष्य पुन्हा जगून कसे वाटले? असे विचारले असता सनीने सांगितले की, माझ्यासाठी ही सिरीज शूट करणे खूप जास्त कठीण होते. मी सांगू शकत नाही की मी कशातून गेले आहे. दुसऱ्या सीजनमुळे तर मी पूर्णपणे तुटले. त्यातून मी अजूनही बाहेर पडू शकलेले नाही.