Ravi Jadhav : रवी जाधव हे आपल्या सर्वांचेच लाडके दिग्दर्शक आहेत. यावर्षी त्यांची 'ताली' ही वेबसिरिज प्रचंड लोकप्रिय झाली होती. सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित ही वेबमालिका होती. या सिरिजला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळाला होता. सुष्मिता सेन हिनं श्रीगौरी सावंत यांची भुमिका केली होती. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. या सिरिजमधून समलैंगिक, ट्रान्सजेंडर समुदायाचा संघर्ष काय असतो याची आपल्या सर्वांनाच प्रचिती आली. त्यातून श्रीगौरी सावंत यांचा संघर्षही फार सोप्पा नव्हता. कौटुंबिक संघर्षापासून ते सामजिक मान्यतेपर्यंत सर्वच स्तरावर त्यांचा संघर्ष करावा लागला होता. रवी जाधव यांच्या या वेबसिरिजमुळे त्यांचीही जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. याआधी त्यांचा 'अनन्या', 'टाईमपास 3' असे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि या चित्रपटांचीही तूफान चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती.
रवी जाधव हे सोशल मीडियावरही अॅक्टिव असतात. त्यातून ते दररोज विविध पोस्ट टाकत चाहत्यांना अपडेट करत असतात. त्यांची मुलं शिक्षणासाठी परदेशात गेलेली असोत वा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असो अथवा बालगंधर्व या चित्रपटाला झालेली 12 यशस्वी वर्ष असोत. रवी जाधव अनेक गोष्टी या चाहत्यांसमवेत शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. यावेळीही त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यातून तुमच्या लक्षात येईल की रवी जाधव यांनी नवी कार विकत घेतली आहे. ही कार पाहून तुम्हालाही असं वाटेल की ही कारही आपल्याला मिळावी. ही कार टोयॉटाची आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे.
हेही वाचा : VIDEO: सुपरस्टार विजयच्या 'लिओ' चित्रपटासाठी चाहत्यांची भयानक गर्दी; चार दिवसांआधीच लावली रांग
सध्या त्यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ काही मिनिटांच व्हायरल झाला आहे. यात या गाडीची लक्झरी पाहून तुम्हीही या कारच्या प्रेमातच पडाल. तुम्हालाही ही कार पाहून... ओह वाहहहह असं म्हटल्याशिवाय तुम्हीही राहणार नाही. या व्हिडीओत तूम्ही पाहू शकता की रवी जाधव आणि मेघना जाधव या नव्या गाडीचं ओपनिंग करत आहेत. ही गाडी चांगलीच मोठी आणि पांढऱ्या रंगाची आहे. यावेळी त्यांच्या या व्हिडीओवर शुभेच्छाचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. ही गाडी इकोफ्रेंडली आणि लक्झरी आहे. Toyota Hycross ZX(O) असं या गाडीचं नावं आहे. रवी जाधव यांनी कॅप्शनमध्ये तसं लिहिलं आहे.
रवी जाधव यांचे 'बालगंधर्व', 'टाईमपास', 'बालक पालक', 'बेन्जो', 'कच्चा लिंबू', 'रंपाट', 'नटरंग' असे अनेक चित्रपट हे गाजले आहेत. यावेळी या कारची किंमत ऑनलाईन पाहिली तर 30 लाख इतकी आहे.