Raveena Tandon : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. रवीना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. इतकंच नाही तर ती स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. पण एक गोष्ट आहे ज्यावर रवीना कधी स्पष्ट बोलली नाही. रवीनानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की तिनं तिच्या मुलांपासून तिची लव्ह लाईफ कधीच लपवली नाही. तिनं तिच्या मुलींना तिच्या सगळ्या रिलेशनशिपविषयी सांगितलं आहे.
रवीनाच्या मुलींविषयी बोलायचे झाले तर तिनं दोन मुली दत्तक घेतल्या असून छाया आणि पूजा अशी त्यांची नावं आहेत. तर अनिल थडानी यांच्याशी लग्न केल्यानंतर तिनं राशा आणि मुलगा रणबीर वर्धनला जन्म दिला. रवीनानं याविषयी बोलताना सांगितलं की, तिच्याविषयी काय काय लिहिलं जातं होतं हे तिच्या मुलांना माहित होतं. याविषयी लहरे रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत याविषयी बोलायताना काही गोष्टी सांगितल्या. 'ती तिच्या मुलांसाठी एका अशा पुस्तकाप्रमाणे आहे ज्याची संपूर्ण माहिती त्यांना आहे. आज नाही तर उद्या ते याविषयी कुठे तरी ऐकणार किंवा वाचणार तर आहेतच. त्यातही जे आहे त्यापेक्षा जास्त किंवा काही वाईट लिहिलेलं ते वाचू शकतात. कारण 90 च्या दशकात पत्रकारिता कसं होतं हे तुम्हाला माहित आहे. येलो जर्नलिज्म पीकवर होतं. पत्रकारितेची मुल्ये घसरलेली होती आणि त्यांना वाटेल ते लिहत असत', असं रवीना म्हणाली.
रवीना पुढे म्हणाली की सोशल मीडियानं सगळं काही बदललं आहे. आता सेलिब्रिटी त्यांना जे वाटतं ते सरळ बोलू शकतात. आधी असं नव्हतं तेव्हा ते संपादकांवर अवलंबून रहायचे. रवीना म्हणाली की 90 च्या दशकात मॅग्झीन तिच्याविषयी खूप वाईट लिहायचे. तिच्या नावासोबत ज्या गोष्टी लिहिल्या जात होत्या त्या लाजवतील अशा होत्या. तिनं अनेकदा मीडियावर असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा : नाशिक-पुणे-नाशिक प्रवासात अल्लु अर्जुनला केतकी माटेगावकरची साथ!
रवीनाच्या रिलेशनशिपविषयी बोलायचे झाले तर 1995 मध्ये 'मोहरा' या चित्रपटातील तिचा सहकलाकार अक्षय कुमारसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. 90 दशकाच्या अखेरीत त्यांचा साखरपुडा देखील झाला होता. पण काही कारणांमुळे ते विभक्त झाले. रवीनाशी ब्रेकअप झाल्यानंकर अक्षय ट्विंकल खन्नाला डेट करू लागला. त्यानंतर अक्षय आणि ट्विंकलनं लग्न केलं. तर रवीनाची भेट ही बिझनेसमॅन अनिल धडानी यांच्याशी झाली आणि त्यांनी देखील सप्तपदी घेतल्या.